Edberg Pereira Assault Case Dainik Gomantak
गोवा

Edberg Pereira: पायात बेड्या घालून बेदम चोप, 'एडबर्ग'प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई झालेला हवालदार कामावर रुजू, पीडिताची प्रकृती अजून गंभीर

Edberg Pereira Assault: नावेली येथील एडबर्ग पेरेरा (वय ३७) या युवकाला मारहाण प्रकरणी शिस्तभंग करवाई झाल्यानंतर सुट्टीवर गेलेला हवालदार मिंगेल वाझ पुन्हा कामावर रुजू झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: नावेली येथील एडबर्ग पेरेरा (वय ३७) या युवकाला मारहाण प्रकरणी शिस्तभंग करवाई झाल्यानंतर सुट्टीवर गेलेला हवालदार मिंगेल वाझ  पुन्हा कामावर रुजू झाला आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी राखीव पोलिस दलात त्याला पाठवून देण्यात आले आहे.

आरोग्याची  समस्या उद्‍भवल्याने तो आजारी सुट्टीवर गेला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मागाहून त्याची गंभीर दखल घेतली होती. व त्याला कामावर रुजू होण्यास खड्या शब्दात बजावले होते व त्याला याबाबत कारवाईच्या इशाऱ्याचे पत्रही दिले होते.

या मारहाण प्रकरणी उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर हे निलंबित झाले असून मिंगेल वाझ व पोलिस शिपाई अजय झिंगली या दोघांवर शिस्तभगाची कारवाई सुरू आहे. या दोघांनाही दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक राखीव दलात  पाठवून देण्यात आलेहोते.

या मारहाण प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नावेली येथे एडबर्गला मारहाण करताना, वाझ व झिंगली या दोघांची छबी बंदिस्त झाली होती.  त्यानंतर एडबर्गला मडगाव पोलिस ठाण्यात आणून पायात बेड्या ठोकून त्याला बेदम मारहाण केली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले होते.

२२ ऑक्टोबरला मारहाणीची ही घटना घडली होती. दैनिक गोमंतकने या मारहाण प्रकरणाला वाचा फोडली होती. मागाहून उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर  याला सेवेतून निलंबित केले होते . त्याच्यावर  भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७ ( जबर मारहाण करणे) १९८ ( सरकारी कर्मचाऱ्याकडून कायद्याचे उल्लंघन करणे) या अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. 

पुढील चौकशीसाठी हे मारहाण प्रकरण क्राईम  ब्रँचकडे सुपूर्द करण्यात आले होते. एडबर्ग याच्यावर अजूनही गोमेकॉत उपचार चालू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने क्राईम ब्रँचला त्याची जबानीही अजून नोंदवून घेता आलेली नाही.

जाफरमियाचे पुन्हा ‘सेटिंग’

मागच्या आठवड्यात नावेली फेस्तात गडगड्याचा पाट मांडून मालामाल झालेल्या जाफर या जुगाऱ्याने या आठवड्यात शनिवारी ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या होली स्पिरीट चर्चच्या फेरीत पुन्हा आपला जुगार थाटण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्याने पोलिसांशी आगाऊ ‘सेटिंग’ही केले आहे. मडगाव पालिकेने हल्लीच नूतनीकरण केलेल्या तिठ्यावर पूर्वी गडगडो चालू होता. जाफर आता याच ठिकाणी आपला पाट मांडणार आहे अशी आतील खबर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "यासाठी मी क्रिकेट खेळतोय"! जसप्रीत बुमराहने सांगितले कारण; व्हिडीओ होतोय तुफान Viral

Kadamba Protest: कदंब कर्मचाऱ्यांचा एल्गार! आझाद मैदानावर धरणार धरणे; बस सेवा राहणार सुरळीत Video

‘बनाना राईड’ ठरली अखेरची! तोल जाऊन महिला पर्यटक पडली पाण्यात, हणजूण समुद्रकिनारी हृदयद्रावक घटना

Lairai Jatra: लईराई देवस्थान जत्रोत्सवाची तयारी! देवस्थान समितीकडून भाविक, धोंडांना सहकार्य करण्याचे आवाहन

ग्राहकाने वीज खात्‍याला तब्बल 250 कोटींना थकवले! 319.74 कोटींची बिले अजूनही थकित; वीजमंत्र्यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT