Edberg Pereira Case: 'नीलेश शिरवईकरला बडतर्फ करा'! नावेलीवासीयांची मागणी; एडबर्ग मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा

Navelim: एडबर्गच्या मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती फेरी काढण्यात आली. या घटनेत गुंतलेल्या सर्व जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Edberg Pereira assault case
Edberg Pereira assault caseDainik Gomatnak
Published on
Updated on

मडगाव: नावेली येथील एडबर्ग परेराला मारहाण केल्याप्रकरणी निलंबित उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर याला बडतर्फ करावे तसेच अन्य दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी रविवारी नावेली येथे करण्यात आली. एडबर्गच्या मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती फेरी काढण्यात आली. या घटनेत गुंतलेल्या सर्व जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो, शंकर पोळजी, सावियो कुतिन्हो, फिडॉल परेरा यांच्यासह एडबर्गचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कुतिन्हो यांनी सांगितले की, पोलिसांनी कायद्याचे पालन न करता केलेली मारहाण ही एडबर्गच्या जीवावर बेतलेली आहे.

त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. उपस्थित नागरिकांनी यावेळी एडबर्ग याला साखळीने बांधण्याच्या कृतीचा निषेध केला. पूर्णपणे बरे झाल्याशिवाय त्याला डिस्चार्ज देऊ नये, अशी मागणी करताना दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्या तपास कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

ठरावही संमत

पोलिसांकडे याचना केली होती पण त्यानंतरही पोलिसांनी पायात बेड्या बांधून त्याला मारहाण केलेली आहे. आम्हाला न्याय द्यावा, असे एडबर्गची आई वियोला परेरा यांनी सांगितले.

Edberg Pereira assault case
Edberg Pereira Assault Case: शिरवईकरला बडतर्फ करून अटक करा, 'आप'ची मागणी; मारहाणीत जखमी एडबर्गची प्रकृती गंभीरच

मारहाण करणाऱ्या पोलिसांवर जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची कलमे लावावीत. चौकशी सुरु असेपर्यंत निलंबित पोलिसांना सेवेत घेउ नये. चुकीची वक्तव्ये करणाऱ्या पोलिस अधीक्षकांची बदली करावी. गोमंतकीय पोलिसांना अधिकारी म्हणून आणावे. सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे. तसेच पूर्ण बरे होईपर्यंत एडबर्गला डिस्चार्ज देउ नये, आदी ठरावही यावेळी घेण्यात आले.

Edberg Pereira assault case
Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

वर्मा यांच्याकडून वेगळी दिशा

टिकमसिंग वर्मा यांच्याकडून या घटनेला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याकडून चौकशी सुरु असताना मारहाण झालेली नसून तोल जाउन पडल्याने एडबर्गला दुखापत झाल्याचे सांगणे चूकीचे आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सार्वजनिक करावे तसेच चुकीची वक्तव्ये करणाऱ्या पोलिस अधीक्षकांना दुसऱ्या राज्यात पाठवण्यात यावे, अशी मागणी अँथनी डिसिल्वा यांनी केली. सावियो कुतिन्हो यांनी मारहाण प्रकरणाचा कुठल्याही स्थितित समर्थन करता येत नसून, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com