Edberg Pereira Case: 'एडबर्ग' मारहाण प्रकरणाचे गूढ वाढले! शिस्तभगांची कारवाई झालेला हवालदार आजारी सुट्टीवर; चर्चांना उधाण

Goa Crime: नावेली येथील एडबर्ग पेरेरा या ३७ वर्षीय युवकाला मारहाण केल्‍याचे प्रकरण अंगावर शेकण्याची दाट शक्यता असलेला हवालदार मिंगेल वाझ आता आजारी सुट्टीवर गेला आहे.
Edberg Pereira assault case, Navelim police assault
Edberg Pereira assault case, Navelim police assaultDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव :  नावेली येथील एडबर्ग पेरेरा या ३७ वर्षीय युवकाला  मारहाण केल्‍याचे प्रकरण अंगावर शेकण्याची दाट शक्यता असलेला हवालदार मिंगेल वाझ  आता आजारी सुट्टीवर गेला आहे. आरोग्याची  समस्या उद्‍भवल्याने  त्याने  ही सुट्टी घेतली आहे, असे त्‍याने आपल्‍या अर्जात म्‍हटले आहे.

या मारहाणप्रकरणी वाझ  व पोलिस शिपाई अजय जांगळी या दोघांवर शिस्तभगांची कारवाई सुरू असून त्यांची दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक राखीव दलात  बदली करण्‍यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अचानक तो रजेवर गेल्याने या मारहाण प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

या मारहाण प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नावेली येथे एडबर्गला मारहाण करताना त्या दोघांची छबी बंदिस्त झाली होती.  त्यानंतर एडबर्गला मडगाव पोलिस ठाण्यात आणून पायात बेड्या ठोकून त्याला बेदम मारहाण केली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले होते. २२ ऑक्टोबरला मारहाणीची ही घटना घडली होती.

Edberg Pereira assault case, Navelim police assault
Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

 दै. ‘गोमन्तक’ने या मारहाण प्रकरणाला वाचा फोडली होती. मागाहून उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर  याला सेवेतून निलंबित केले होते. त्याच्यावर  बीएनएसच्या कलम ११७ , १९८ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. 

Edberg Pereira assault case, Navelim police assault
Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

एडबर्ग प्रकृती चिंताजनक

एडबर्ग याच्यावर अजूनही गोमेकॉत उपचार चालू आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही  झाली असून अजूनही त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो व अन्य  सामाजिक कार्यकर्त्यांनी नंतर दक्षिण गोवा पोलिस  मुख्यालयात मोर्चा काढून दोषी पोलिसांना बडतर्फ करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com