ग्राहकाने वीज खात्‍याला तब्बल 250 कोटींना थकवले! 319.74 कोटींची बिले अजूनही थकित; वीजमंत्र्यांनी दिली माहिती

Electricity department pending bills: औद्योगिक ग्राहकांची जी सुमारे ४२६ कोटींची बिले प्रलंबित आहेत, त्‍यातील सुमारे २५० कोटी फोंडा येथील मेसर्स ट्वेंटी फर्स्ट सेंच्‍युरी वायर रोड्स या कंपनीने थकवले.
Electricity department pending bills
Electricity department pending billsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज खात्‍याची ३१९.७४ कोटींची बिले अजूनही प्रलंबित आहेत. यात सर्वाधिक २६४.२७ कोटींची बिले औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांची असून, त्‍यातील केवळ एकाच ग्राहकाने खात्‍याला २५०.८० कोटींना थकवल्‍याचे वीजमंत्र्यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरात दिलेल्‍या माहितीतून समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता. त्‍यातून घरगुती ग्राहकांची आतापर्यंत २३.५०, व्‍यावसायिक ग्राहकांची ३१.९७ आणि औद्योगिक ग्राहकांची २६४.२७ कोटींची वीज बिले प्रलंबित आहेत. औद्योगिक ग्राहकांची जी सुमारे ४२६ कोटींची बिले प्रलंबित आहेत, त्‍यातील सुमारे २५० कोटी फोंडा येथील मेसर्स ट्वेंटी फर्स्ट सेंच्‍युरी वायर रोड्स या कंपनीने थकवले.

हे प्रकरण सध्‍या राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणात (एनसीएलटी) सुरू असल्‍याचे वीजमंत्र्यांनी उत्तरातून सांगितले आहे. दरम्‍यान, घरगुती, व्‍यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांनी थकवलेली बिले आणि ग्राहकांच्‍या नावांची यादीही मंत्र्यांनी उत्तरातून सादर केली आहे.

Electricity department pending bills
Smart Electricity Meter: स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नको, ग्राहकांची संमती अनिवार्य करा; वीज खात्याला निवेदन

वीज विभाग वीजपुरवठा संहिता, २०१८ चे पालन करतो आणि त्याच्या कलम ९.१ अंतर्गत आणि वीज कायदा २००३ च्या कलम ५६ अंतर्गत तरतुदींनुसार ग्राहकांना १५ दिवसांच्‍या वीज खंडित करण्याच्या सूचना दिल्या जातात. तसेच, ग्राहकांना त्यांच्या माहितीसाठी जारी केलेल्या वीज बिलाच्या मागील बाजूस ‘वीज बिलाची रक्कम नियमित भरण्यात अयशस्वी झाल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल’, असेही लिहिले जाते, असेही मंत्र्यांनी नमूद केले आहे

Electricity department pending bills
Goa Electricity Bill: गोव्यात वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! दंड आकारणीचा फटका; लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण

ग्राहकांकडूनच ‘ओटीएस’ची मागणी

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी २०२२ मध्‍ये वीज खात्‍याने एकरकमी परतावा योजना (ओटीएस) तयार केली होती. थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी खंडित करण्याची मोहीम विभागाने हाती घेतल्यानंतर अधिकाधिक ग्राहकांनी विभागाशी संपर्क साधून ‘ओटीएस’ पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. त्‍यानुसार ही योजना सुरू करण्‍यात आली होती, असेही वीजमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com