Terrace Garden Dainik Gomantak
गोवा

Terrace Garden: पोषक भाजीपाला लागवडीचे पर्यावरणपूरक ‘टेरेस गार्डन’

घराच्या चार भिंतीत राहून काही उपक्रम राबविता येईल का, या विचाराने प्रेरित होत पर्रा येथील कालिंदी साळगावकर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर पर्यावरणपूरक ‘टेरेस गार्डन’ बनविले.

दैनिक गोमन्तक

Terrace Garden: घराच्या चार भिंतीत राहून काही उपक्रम राबविता येईल का, या विचाराने प्रेरित होत पर्रा येथील कालिंदी साळगावकर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर पर्यावरणपूरक ‘टेरेस गार्डन’ बनविले. 60 वर्षीय कालिंदी यांना शेतीविषयी आवड. मागील चार वर्षांपासून या टेरेस गार्डनमधून कालिंदी यांनी पोषक व रसायनमुक्त घरगुती भाजीपाला, विविध फुलझाडांची लागवड केली आहे.

कोरोनाच्या काळात कालिंदी यांनी ‘टेरेस गार्डन’ संकल्पना चालीस लावली. घरातल्या वापरानंतर तुटले-फुटलेले प्लास्टिकचे टब, बादल्या, कुंड्यांमधून त्यांनी शेवंती, अबोली या फुलझाडांसह ब्रोकोली, वालपापडी, मिरची, भेंडी, वांगी, पपई, आले, लिंबू, टोमॅटो आदी झाडे त्यांनी आपल्या घरच्या टेरेसवर फुलविली आहेत. शेतजमिनीत त्या ‘ज्योती’ हे भातपीकदेखील घेतात.

कालिंदी यांना नुकतेच या वर्षीचे बॉटनिकल सोसायटी ऑफ गोवाकडून होम गार्डन स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. गेल्या वर्षी त्या स्पर्धेत दुसऱ्या मानकरी ठरल्या होत्या.

स्वतःचे पीक घ्यावे

सध्या टेरेस बागेत काळी हळद, द्राक्षे, आंबा, सफरचंदांची कलमे लावली आहेत. यासाठी कृषी विभाग तसेच बार्देश विभागीय कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गेल्या वर्षी जवळपास चार ते पाच हजारांची शेवंती व अबोलीची रोपटी विकली.

लोकांनी आरोग्यासाठी बागकाम किंवा टेरेस गार्डन यासारख्या संकल्पनेतून ताज्या व पोषक भाज्यांची लागवड करून स्वतःचे पीक घ्यावे, असे आवाहन कालिंदी साळगावकर यांनी केले.

बागकामामुळे मन प्रसन्न होते...

  • शेती ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच बागकामामुळे मन प्रसन्न राहते.

  • मुलांना शाळांमध्ये शेतीविषयी प्रात्यक्षिके दाखविली पाहिजेत.

  • लोकांनी खुल्या जागेत किंवा टेरेसवर जास्त खर्च न करता फळभाज्यांची लागवड करावी.

  • घरात असलेले व वापरतात नसलेले प्लास्टिक किंवा बादल्यांचा यासाठी वापर करावा.

बाजारात भेटणाऱ्या फळभाज्या ताज्या नसतात. किंबहुना भाजी पिकविण्यासाठी केमिकलचा वापर सर्रास होतो. अशावेळी घरच्या घरी उगवलेल्या पोषक फळभाज्या या नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असातात.

याच तत्त्वावर गच्चीवर बाग फुलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील चार वर्षांपासून इथे फुलझाडे तसेच विविध भाज्यांचे पीक घेते. - कालिंदी साळगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राज्यात आधुनिक क्रीडा सुविधांसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही; युवा क्रीडापटूंना संधी देण्यावर भर

Gorvancho Padwo: शेणाचे गोठे, कारिटांच्या गायी; 'गोरवांचो पाडवो' साजरा करण्याची गोव्याची अनोखी

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक, हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी मोठा अपघात टळला; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

World Cup 2025: भारतीय महिला संघासाठी अस्तित्वाची लढाई; गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी काय आहे समीकरण?

अग्रलेख: 40 वर्षांपूर्वी लावलेली रवि नाईकांच्या भूस्वाभिमानाची ज्योत आजही तेवत

SCROLL FOR NEXT