Winter Dainik Gomantak
गोवा

Goa Winter: गोमंतकीयांनो काळजी घ्या! पारा खाली उतरणार; गोव्यासह उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी

Goa weather: राज्यात किमान १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून सरासरी तापमानाच्या तुलनेत ३.९ अंशांनी घट नोंदविली आहे.

Sameer Panditrao

पणजी: पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने राज्यात किमान तापमानाचा पारा दिवसेंदिवस घटत आहे.

राज्यात किमान १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून सरासरी तापमानाच्या तुलनेत ३.९ अंशांनी घट नोंदविली आहे. पुढील दोन-तीन दिवस गोव्यासह उत्तर कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार असल्याचे सांगण्यात आले.

गोव्यात किमान पारा १८ ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

कारवार, बेळगाव शहर गारठले

गोव्यासोबतच उत्तर कर्नाटकातील कारवारात थंडीचा प्रभाव अधिक असून बेळगावात देखील मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. या भागात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असून उत्तर प्रदेशमध्येही थंडीसह दाट धुके पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

Goa Opinion: गोव्याचा दुसरा मुक्तिलढा जमीन माफियांविरुद्धचा असेल..

2 दिवसांच्या कामासाठी दिले 500 रुपये मानधन! बालरथ चालकांचा ठिय्या; तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त Watch Video

Vijay Hazare Trophy: शुभमची संघात वापसी, कर्णधारपदाची धुरा दीपराजच्या खांद्यावर; एकदिवसीय स्पर्धेसाठी गोव्याचा संघ जाहीर

गोव्यासाठी विमान प्रवास महागला! नाताळच्या काळात तिकीट दरात मोठी वाढ; जयपूरहून येणाऱ्या पर्यटकांना बसतोय सर्वाधिक फटका

SCROLL FOR NEXT