Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Goa Weather State Unstable Climate: अनेकांना हिवाळा हवाहवासा वाटतो, परंतु हिवाळा आपल्यासोबत अनेक आजार देखील घेऊन येत असतो.
Goa Weather
Goa WeatherDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अनेकांना हिवाळा हवाहवासा वाटतो, परंतु हिवाळा आपल्यासोबत अनेक आजार देखील घेऊन येत असतो. राज्यात सध्या दिवसा उष्मा आणि रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. सातत्‍याने होणाऱ्या हवामान बदलांमुळे थंडी, पडसे, खोकला, ताप, घसा खवखवणे आदी संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

हिवाळ्याच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे असे अनेक प्रकार घडत असतात. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

कोमट पाणी प्या

या काळात थंडी अधिक असल्याने, कधी उष्मा तर थंडी असे प्रकार घडत असल्याने पाणी गरम करून प्यावे, कोमट पाणी पिणे अधिक चांगले जेणेकरून थंडी, पडसे, घसा खवखवणे आदी प्रकार टाळणे शक्य होते.

Goa Weather
Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

व्यायाम महत्त्वाचा

हिवाळ्यात व्यायामासाठी सर्वोत्तम काळ असतो. सकाळी मॉर्निंग वॉक, व्यायाम, योगासने प्राणायाम करणे, सूर्यस्नान आदी केल्याने आरोग्य सुदृढ राहते.

संतुलित आहार गरजेचा

हिवाळ्यात भूक वाढत असते, तेलकट आणि गोड पदार्थ खावेसे वाटतात. ते आवश्‍यकतेनुसार घेणे गरजेचे. या काळात येणाऱ्या हंगामी भाज्या, सुका मेवा तसेच शरीराला उष्णता आणि पोषण देणारे पदार्थांचे सेवन करणे कधीही उत्तम.

त्वचेची घ्या काळजी

थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडणे, केसात कोंडा तयार होणे आदी प्रकार घडतात, यासाठी कोरफड जेल, नारळ तेल, त्वचेला सुरक्षा पोचविणारी उत्पादने वापरणे, त्वचा सुंदर राहण्यासाठी पुरेसे पाण्याचे सेवन करणे देखील गरजेचे आहे. या दिवसांत ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते. ओठासाठी चांगल्या गुणवत्तेचे मॉइश्चरायझिंग लिप बाम वापरावा.

राज्यात हवामान बदलांमुळे संसर्गजन्य आजार जसे की सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांत वाढ झाली असून नागरिकांनी घराबाहेर थंड हवेत जाताना योग्य ती काळजी घेणे, संतुलित आहार घेणे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे.

- डॉ. उम्मीद कुमार मीना.

Goa Weather
Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

उबदार कपडे वापरा

थंडीच्या कालावधीत पायांना भेगा पडणे तसेच थंडीमुळे इतर आरोग्याच्या समस्या घडत असतात त्यामुळे या कालावधीत उबदार कपडे जसे की स्वेटर, मोजे, हातमोजे, मफलर, टोपी आदींचा वापर करणे गरजेचे असते. खासकरून वाहन चालविताना किमान कानटोपी आणि हातमोजे वापरावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com