E Passport Goa Dainik Gomantak
गोवा

E Passport: डिजिटल क्रांती! गोव्यात मिळणार 'ई-पासपोर्ट'! तपासणी प्रक्रिया होणार जलद

E Passport Goa: भारतातील पासपोर्ट सेवेत होत असलेल्या डिजिटल क्रांतीत गोव्याचाही समावेश झाला असून, आता पणजी येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय देखील ई-पासपोर्ट जारी करणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: भारतातील पासपोर्ट सेवेत होत असलेल्या डिजिटल क्रांतीत गोव्याचाही समावेश झाला असून, आता पणजी येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय देखील ई-पासपोर्ट जारी करणार आहे. या उपक्रमामुळे गोव्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि जागतिक मान्यताप्राप्त प्रवासाची नवी सुविधा मिळणार आहे.

सरकारने लागू केलेल्या पासपोर्ट सेवा कार्यक्रम पीएसपी २.० अंतर्गत, ई-पासपोर्ट प्रणाली देशभरातील निवडक प्रादेशिक कार्यालयांमध्ये अंमलात आणली जात आहे. गोवा हे त्या अग्रगण्य केंद्रांपैकी एक बनले असून नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, शिमला, जयपूर, रांची, अमृतसरआणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये या सुविधेचा यशस्वी अनुभव घेण्यात आला आहे.

गोव्यामधून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा विशेष फायदेशीर ठरणार आहे. भविष्यात यामुळे ई-व्हिसा, स्मार्ट कस्टम्स व एआय-आधारित सीमा नियंत्रण यांसारख्या डिजिटल सेवा सहज उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

तामिळनाडूमध्ये ३ मार्च २०२५ पासून सुरू झालेल्या ई-पासपोर्ट वितरणात १९ दिवसांत तब्बल २०,७२९ पासपोर्ट वितरित करण्यात आले. या जलद प्रतिसादाचा सकारात्मक परिणाम आता गोव्यातही दिसून येण्याची शक्यता आहे.

ई-पासपोर्ट घेणे सध्या सक्तीचे नसले, तरी नवीन अर्जदार किंवा नूतनीकरण करणाऱ्यांना डिफॉल्टने ई-पासपोर्टच दिला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पारंपरिक पासपोर्ट निवृत्त होत जातील आणि ई-पासपोर्ट हेच मानक दस्तऐवज बनतील.

या नव्या पावलामुळे गोवा हे केवळ पर्यटनस्थळ म्हणूनच नव्हे, तर डिजिटल ट्रॅव्हल सुविधांचा अग्रगण्य केंद्र म्हणूनही पुढे येत आहे, असे म्हणावे लागेल.

विमानतळांवरील तपासणी प्रक्रिया होणार जलद

ई-पासपोर्टच्या माध्यमातून प्रवाशांचे बायोमेट्रिक व वैयक्तिक तपशील एका सुरक्षित मायक्रोचिपमध्ये संग्रहित केले जातात. ही चिप रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारित असून फसवणूक, बनावट ओळख व कागदपत्रांच्या चुकीच्या वापरास आळा घालण्यास मदत करते. ई-पासपोर्टमुळे विमानतळांवरील तपासणी प्रक्रियाही जलद आणि स्पर्शविरहित होणार आहे, ज्यामुळे कोविडनंतरच्या काळात प्रवाशांचे आरोग्य सुरक्षित ठेवले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT