Amit Shah & Pramod Sawant
Amit Shah & Pramod SawantDainik Gomantak

Portuguese Passport: पोर्तुगीज पासपोर्ट प्रश्‍नाला चालना मिळण्याची शक्यता; लवकरच मुख्यमंत्री- अमित शहा चर्चा करणार

Portuguese Passport: पोर्तुगीज पासपोर्टप्रश्‍नी मुख्यमंत्रीआज गृहमंत्री शहा यांना भेटणार- समस्याग्रस्त गोमंतकीयांशी सावंत यांनी साधला संवाद
Published on

Portuguese Passport: ज्या गोमंतकीयांचा जन्म पोर्तुगालमध्ये नोंद आहे, त्यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करणे केंद्र सरकारने बंद केल्याने त्यांच्या पाल्यांनाही भारतात येणे अशक्य झाले आहे.

याच विषयासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विदेश व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्याकडे चर्चा केली होती. या विषयाबाबत महत्वाची माहिती समोर येतेय.

पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे भारतीय पासपोर्ट मागे न घेता तो जमा करून घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जावे, ही मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहेत.

मुख्यमंत्री सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे उद्या (शनिवारी) दिल्लीत शहा यांची भेट घेणार आहेत.

पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे नूतनीकरणावेळी भारतीय पासपोर्ट मागे घेतले जाण्याच्या घटना अलीकडे घडू लागल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने तसा निर्णय घेतला आहे.

असा पासपोर्ट मागे घेतल्यामुळे या गोमंतकीयांना अनिवासी भारतीय ओळखपत्रासाठी अर्ज करता येत नाही की, त्यांना पोर्तुगीज पासपोर्टही घेता येत नाही.

Amit Shah & Pramod Sawant
Goa Congress: पर्रीकरांच्या 'त्या' निर्णयामुळेच आज राज्यात बेरोजगारीची समस्या; खाणकाम, म्हादई डीपीआर, रोजगाराबाबतही सरकार 'फेल'

त्यांचा पासपोर्ट मागे घेतला गेल्याने त्यांच्या मुलांना विदेशातून भारतात येण्यासाठी व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.

पोर्तुगालमध्ये जन्म नोंद केलेल्या गोमंतकीयांच्या मुलांना भारतीय पासपोर्टही देणे नाकारले जात आहे.

अशा समस्यांनी ग्रस्त गोमंतकीयांसोबत आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात संवाद साधला. त्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री शहा यांच्यासोबत उद्या होणाऱ्या बैठकीत हा विषय उपस्थित करू, असे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com