E-Passport: आंतरराष्ट्रीय प्रवास व व्हिसा प्रक्रिया झाली सुलभ; गोव्यात ‘ई-पासपोर्ट’ जारी करण्यास सुरुवात

E-Passport Service: भुवनेश्‍वर, नागपूर व गोवा येथील पासपोर्ट कार्यालये नागरिकांना ई-पासपोर्ट जारी करत आहेत.
Goa Begins Issuing E-Passports on Trial Basis!
E-PassportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने प्रायोगिक तत्त्वावर नागरिकांना ‘ई-पासपोर्ट’ जारी करण्यास सुरुवात केली आहे.

ई - पासपोर्ट हे दस्तावेज व इलेक्ट्रॉनिक घटकांचे संयोजन आहे ज्यामध्ये महत्वाचा डेटा संग्रहित करणारी एम्बेडेड चिप समाविष्ट आहे. भुवनेश्‍वर, नागपूर व गोवा येथील पासपोर्ट कार्यालये नागरिकांना ई-पासपोर्ट जारी करत आहेत.

या ई पासपोर्ट सुविधेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास व व्हिसा प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत बनली आहे. व्यक्तीच्या ओळखीची चोरी होण्याला प्रतिबंध होणार आहे. सुरक्षित शिष्टाचार, प्रगत एन्क्रिप्शन, ई पासपोर्ट संवेदनशील वैयक्तिक माहितीचे संरक्षण तसेच डेटामध्ये अनधिकृतणे फेरफार करणे शक्य होणार नाही.

Goa Begins Issuing E-Passports on Trial Basis!
Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; मुंबईला जाणाऱ्या ट्रेनच्या नियोजित स्थानकांत बदल

प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या ई पासपोर्टसाठी फक्त काही विशिष्ट क्षेत्रातील लोक अर्ज करण्यास पात्र आहेत. कोणत्याही संभाव्य त्रुटी ओळखून चिप, बायोमेट्रिक डेटा संकलन व वाचक तंत्रज्ञानासह ई पासपोर्ट प्रणालीची कार्यक्षमता तपासणे हे प्राथमिक ध्येय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com