E-Beat Mobile App Daink Gomantak
गोवा

E-Beat App: गोव्यातील विद्यार्थ्यांनी लावलाय भन्नाट शोध, पोलिसांना होणार मोलाची मदत

नुकतेच विद्यार्थ्यांनी या एप्लिकेशनचा मुख्यमंत्री यांच्यासमोर डेमो सादर केला.

Pramod Yadav

E-Beat App: आजकालच्या डिजिटल जगात तंत्रज्ञान वेगाने प्रगत होत आहे. विविध गरजा लक्षात घेऊन नानाप्रकारचे शोधही झपाट्याने होत आहेत. मोबाईल आणि इंटरनेट क्रांती झाल्यापासून एप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक सुविधा आणि सेवा सहज मिळवणे शक्य झाले आहे. सरकारच्या आणि प्रशासन पातळीवर देखील डिजिटल सेवांचा वापर होत आहे.

गोव्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एक भन्नाट शोध लावलाय, ज्याचा पोलिसांना मोठा फायदा होणार आहे.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्मागुडी आणि इन्फोटेक कॉर्पोरेशन, अल्तिनो यांनी संयुक्तपणे 'ई-बीट बुक' नावाचे मोबाईल एप्लिकेशन डेव्हलप केले आहे.

नुकतेच विद्यार्थ्यांनी या एप्लिकेशनचा मुख्यमंत्री यांच्यासमोर डेमो सादर केला. सावंत यांनी या शोधाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'ई-बीट बुक' मोबाईल एप्लिकेशनची पोलिसांना मोठी मदत होणार आहे. पोलीस एका क्लिकवर प्रत्येक बीटची माहिती मिळवू शकणार आहेत.

या एप्लिकेशनमुळे गोवा पोलिसांना मोलाची मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, गोव्यातील विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद तंत्रज्ञान विकसित केल्याचे सावंत यांनी म्हटले असून, विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Zilla Panchayat Election: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत 80% नव्‍या चेहऱ्यांना संधी! दामू नाईक यांची माहिती; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मोबाईलचा तपास अजूनही नाहीच...

Goa Live News: मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या 8 पाल्यांना शासकीय नोकरी प्रदान

Cuncolim Liquor Case: 2 महिने उभा होता संशयास्पद ट्रक, आत होती 57 लाखांची दारू; मुख्य संशयित अजूनही गायब

..त्याला 'गोव्यात' यायचे होते, अमेरिकेत झाला स्थानबद्ध! पोर्तुगाल पासपोर्ट असून 'दिल्ली'त केले हद्दपार; काय झाले नेमके? वाचा

SCROLL FOR NEXT