Due to unseasonal rains and heat cashew crop in Goa has declined Dainik Gomantak
गोवा

अवकाळी पाऊस, उष्णतेमुळे गोव्‍यातील काजू पीक घटले

सुमारे 40 टक्‍के फळांची गळती: काजूगर काळवंडल्‍याने दर उतरले

दैनिक गोमन्तक

पणजी: काजू उत्‍पादनात गोवा अग्रेसर मानला जातो. मात्र यंदा काजूचे उत्पन्न घटल्‍याने काजू उत्‍पादकांतून काळजीचा सुर उमटत आहे. राज्‍यातील बहुतांश भागात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेषतः पेडणे, सत्तरी, डिचोली या तालुक्‍यात मोठे उत्‍पन्न घेतले जाते.

याबाबत कृषी संचालक नेविल अल्‍फान्‍सो यांना विचारले असता ते म्‍हणाले, दमट हवामान आणि अवकाळी पावसामुळे यावर्षी काजू उत्‍पादन घटले आहे. गोव्‍यातील काजुगरास देशातून आणि जगभरातून मागणी असते. यामुळे बहुतांश शेतकरी काजू उत्‍पादनाकडे अधिक वळतात. यावेळी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला.

दमट हवामान तसेच वाढलेली उष्णता यामुळे काजूचा मोहोर गळून पडला. तसेच गेल्‍या पंधरा-वीस दिवसांत झालेल्‍या पावसामुळेही फळे गळाली. राज्‍यातील काजु उत्‍पादनात अंदाजे 40 टक्‍के इतकी घट झाली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राज्‍यात सुमारे 55 हजार हेक्‍टर इतक्या मोठया प्रमाणात काजूची लागवड करण्यात येते. दरवर्षी प्रति हेक्‍टर 500 किलो या प्रमाणात अंदाजे 24 हजार मेट्रिक टन इतके काजू बियांचे उत्‍पन्न होते. मात्र यंदा यात घट होण्याची शक्‍यता आहे. काजूगर काळी पडल्‍याने यांना चांगला दर मिळत नाही, अशी माहिती कोपार्डे - सत्तरी येथील काजू उत्‍पादक उल्‍हास सामंत यांनी दिली. सत्तरी तालुक्‍यातील बागायतदार आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात काजू उत्‍पन्न घेतात. बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह काजू उत्‍पन्नावरच अवलंबून आहे. यावर्षी काजू उत्पन्नात घट झाल्‍याने आम्‍ही चिंतेत असल्‍याचे श्री. सामंत म्‍हणाले.

सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई म्हणाले, साधारणपणे मार्च महिन्‍यात काजूचे पीक काढणीस येते. पण यंदा अवकाळी पाऊस आणि प्रचंड उष्णता यामुळे मोहेार गळून पडला आहे. शेतकऱ्यांच्‍या नुकसानीचा विचार करून सरकारने काजूची आधारभूत किंमत वाढवावी, अशी मागणी ॲड. देसाई यांनी केली. कृषी खात्‍याच्‍या योजनांतर्गत सरकारने काजू उत्‍पादकांची मदत करावी. आणि सर्वसामान्‍य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

दरम्‍यान, काजू उत्‍पादकांचे नुकसान झाले आहे. निम्याहून अधिक पीक वाया गेले आहे. कृषी खात्‍यातर्फे याचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती श्री. अल्‍फान्‍सो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT