धो-धो पावसातही, बरसल्या पं. कडकडेंच्‍या सुरांच्‍या सरी...

होंडावासीय मंत्रमुग्‍ध: माईकशिवाय आळविला राग; पर्जन्‍यराज हिरमुसला
पं. अजित कडकडे
पं. अजित कडकडेDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: गोव्यातील संगीतप्रेमी नेहमीच गायनाच्या कार्यक्रमांना दाद देत असतात. गायक व रसिक यांच्यात अतूट अशी मैत्रीची माळ गुंफलेली असते. याचाच प्रत्यय काल सोमवारी वरचे हरवळे-होंडा येथील श्री आजोबा देवस्थानात आला. या देवस्थानचा 13वा वर्धापनदिन सोहळा सध्‍या सुरू आहे. यानिमित्त सुप्रसिद्ध गोमंतकीय गायक पं. अजित कडकडे यांच्‍या गायनाचा कार्यक्रम रात्री आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. पण मध्‍येच सोसाट्याच्‍या वाऱ्यासह पाऊस आला..सर्वजण आश्रयासाठी इतरत्र धावू लागले..कडकडेंनी गायन सुरूच ठेवले..अन्‌ माघारी फिरलेले लोकही पुन्‍हा परतले...मैफलीने शिखर गाठले.

पं. अजित कडकडे
गोवा डेअरीच्या आमसभेत येणार 'ऑडिटचा' विषय

होंडा येथील श्री आजोबा देवस्‍थानच्‍या वर्धापनदिन सोहळ्‍याला कालपासून प्रारंभ झाला आहे. त्‍यानिमित्त रात्री 9 वाजता पं. अजित कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. दोन गीते सादर केल्‍यानंतर तिसरे गीत सादर करताना सोसाट्याचा वादळी वारा, विजेचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. कार्यक्रमाला उपस्थित रसिकांची मोठी निराशा झाली. काही क्षणातच पावसाने रौद्रअवतार धारण केला. मंडप कापडी होता. त्यामुळे रसिकांना खुर्ची सोडून मंदिरात आसरा घ्यावा लागला. रंगमंचाला पत्र्यांचे आच्छादन असल्याने कलाकार तिथेच थांबले. पं. कडकडे यांनीही बसलेल्‍या गादीची जागा सोडली नाही व आपले गायन सुरूच ठेवले. तेही माईक साऊंड शिवाय. त्‍यामुळे घरी जायला वळलेले रसिकही थबकले. त्‍यांनी कडकडे यांच्‍या सभोवताली घोळका करून गायनाचा आस्‍वाद घेतला. सुमारे ५००हून अधिक रसिक यावेळी उपस्थित होते.

पं. अजित कडकडे
कळंगुट रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणी एकाला 'जामीन'

पावसामुळे लोकांनी खुर्च्या सोडल्या व रंगमंच गाठला. धो-धो पावसात कडकडे यांच्या गायनाची मैफल रंगली. रंगमंचावर रसिक कडकडे यांच्याजवळ येऊन बसले. प्रेक्षकस्थानी कोणीच नव्हते. कडकडे यांनी त्‍यांना निराश केले नाही. त्‍यांनी एकापेक्षा एक अधिक गीते सादर करून रसिकांना रिझविले. हा क्षण लोकांना परमानंद देणारा ठरला.

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत देसाई, उपाध्यक्ष धर्मेंद्र शिरोडकर, अंबरनाथ कोरगावकर, सचिव अनंत धुमे, खजिनदार सत्यवान नाईक, सहखजिनदार राघोबा परब, सहसचिव रामचंद्र मराठे, उत्सव समितीचे अध्यक्ष विठोबा वांतेकर, सचिव दीपेश मणेरकर, महिला अध्यक्ष सुफला देसाई यांचीही उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com