Goa Police Dainik Gomantak
गोवा

Gomantak Exclusive: दक्षिण गोव्यात ड्रग्स पेडलर मोकाट; गोवा पोलिसांची नाचक्की!

Goa: राज्याभोवती ड्रग्सचा विळखा वाढू लागला असून, पोलिस याकडे डोळेझाक करत आहे.

दैनिक गोमन्तक

Gomantak Exclusive: कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही; पण दक्षिण गोव्याचे जिल्हा मुख्यालय असलेल्या मडगाव शहराभोवतीच ड्रग्सचा विळखा वाढू लागला आहे. मात्र, पोलिस याकडे डोळेझाक करत आहेत. 19 सप्टेंबर रोजी क्राईम ब्रँच पोलिसांनी मडगाव ईएसआय इस्पितळामागे छापा घालून दोन युवकांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाखाचा गांजा जप्त केला.

दोन महिन्यांपूर्वी आझाद नगरी येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या मुक्तार बदानी या युवकावर सहाजणांच्या गटाने हल्ला करून त्याचा खून केला होता. त्यावेळी हे हल्लेखोर ड्रग्स तस्करीतील असल्याचा आरोप केला होता. या दोन घटनांवरून या परिसरात ड्रग्सचा सुळसुळाट सुरू असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार नामक इसम या परिसरात ड्रग्स व्यवसाय करत असून ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. पण पोलिस त्याच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. केरळ आणि दिल्लीतून येणारा माल मडगाव रेल्वे स्थानकावर उतरवून तो राज्यात सर्वत्र पोहोचविणे हे त्याचे काम असून गोव्यात सगळीकडे नेटवर्क आहे, असे सांगितले जाते. दक्षिण गोव्यात येणारा बहुतेक माल रेल्वेतूनच येत असून यापूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावर दोन मोठ्या कारवायाही झाल्या आहेत.

उत्तर गोव्यात जसे कॉस्मेटीक ड्रग्स घेण्यासाठी पर्यटक येतात, तसे दक्षिण गोव्यात येत नाहीत. तरीही येथे या समस्येची तीव्रता कमी, असे मात्र कुणी वाटून घेऊ नये. कारण येथील धोक्याची बाजू म्हणजे येथे गांजा विकला जात असला तरी तो गावातील तरुणांपर्यंत पोहोचला आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या या विषवल्लीची पाळेमुळे आताच खणून काढली नाहीत तर येत्या काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दक्षिण गोव्यात पोलिस दप्तरी या गेल्या 9 महिन्यांत फक्त 22 गुन्हे नोंद झाले असून वास्को, मडगाव व फोंडा पोलिस स्थानकांच्या हद्दीत सर्वांत जास्त गुन्हे नोंद झाले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 25 जणांना अटक करून सुमारे 44 लाखांचा माल जप्त केला आहे.

मडगाव हाऊसिंग बोर्ड परिसरात सूरज आणि बाबू हे दोन पेडलर्स या व्यवसायात सक्रिय असून ते दोघेही मोबाईलवर ऑर्डर घेऊन माल सप्लाय करतात, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. लोटली आणि कुडतरी भागांत ड्रग्सचा सुळसुळाट असून दोन वर्षांपूर्वी लोटली येथे झालेल्या पार्टीत ड्रग्स घेतल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. खारेबांध, दामोदर महाविद्यालय परिसरातही बऱ्याच वेळी ड्रग्स आढळून आला आहे

काणकोण येथील ‘लोटस गँग’ चर्चेत

ओडिशातून येतो गांजा: पूर्वी गोव्यात येणारा गांजा हा हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि केरळमार्गे यायचा. मात्र, मागच्या काही वर्षांत ओडिशामधून गोव्यात कामासाठी येणारे कामगार येताना सोबत गांजा घेऊन येतात.

आता ‘म्याव म्याव’ ड्रग्स

दक्षिण गोव्यात महाग असलेले सिंथेटिक ड्रग्स कुणी घेत नाहीत; पण गांजाचे सेवन सर्रास केले जाते. कोकेन पावडरसारखा दिसणारा ‘म्याव म्याव’ हा नवीन अमली पदार्थ सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय असून तो कमी पैशांत मिळतो. त्यामुळे त्याला मागणीही जास्त आहे. युवकांना या ड्रग्सची सवय लागावी यासाठी सुरुवातीला तो फुकट वाटला जात होता, अशी माहिती मिळाली आहे.

दक्षिण गोव्यात सर्वाधिक प्रमाणात पर्यटक काणकोण येथे येतात. येथील पाळोळे व आगोंद हे किनारे मुख्य ड्रग्स डेस्टीनेशन्स बनली आहेत. या भागात ‘लोटस गँग’ नावाने एक टोळी या व्यवसायात सक्रिय आहे, असे सांगण्यात येते.

सासष्टीतील कोलवा, मोबोर, केळशी हे समुद्र किनारेही ड्रग्ससाठी कुप्रसिद्ध असून रात्रीच्या वेळी ओर्ली पुलावर बसून युवक ड्रग्ससेवन करतात, हे स्थानिक आमदार वेंझी व्हिएगस यांनी हल्लीच प्रशासनाच्या नजरेस आणून देताना या पुलावर रात्री या पुलावर पोलिस तैनात करा, अशी मागणी केली होती.

फ्रान्सिस सार्दिन, खासदार-

पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय हा व्यवसाय येथे चालूच शकणार नाही. गोवा पोलिस किती निष्क्रिय आहेत ते तेलंगणा पोलिसांनी उघड करून पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. आमच्या पोलिसांनी रात्री जाऊन लोकांच्या लग्नाच्या पार्ट्या बंद करण्याऐवजी शॅक्स आणि हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत ज्या पार्ट्या सुरू असतात, त्या बंद कराव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT