Goa Crime: 'हिल टॉप' रेस्टॉरंटचा मालक स्टिव्हचा ट्रांझिट रिमांड मंजूर

Goa: वैद्यकीयदृष्ट्या प्रवास करण्यास फिट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने रिमांड मंजूर केला.
John Stephen D'Souza
John Stephen D'Souza Dainik Gomantak

Goa Crime: हैदराबाद पोलिसांना ड्रग्स प्रकरणात हवा असलेला हणजूण येथील ‘हिल टॉप’ रेस्टॉरंटचा मालक जॉन स्टीफन डिसोझा उर्फ स्टिव्ह याला गुरुवारी न्यायालयाने दोन दिवसांचा ट्रांझिट रिमांड मंजूर (Transit Remand Granted) केला. संशयित वैद्यकीयदृष्ट्या प्रवास करण्यास फिट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने रिमांड मंजूर केला.

स्टिव्हची प्रकृती लक्षात घेता पोलिसांनी त्याला विमानानेच हैदराबादला न्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच संशयिताच्या वैद्यकीय सूचीचे पालन पोलिसांनी प्रवासादरम्यान करावे. शिवाय 24 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद येथील कोर्टात संशयितास दुपारी 3 वाजेपर्यंत हजर करण्याचे निर्देश म्हापसा न्यायालयाने दिले.

John Stephen D'Souza
Goa Police: बढती मिळाली, पण पुढे काय? अधिकाऱ्यांना लागली कार्यभाराची प्रतीक्षा

वैद्यकीय अहवालानंतर रिमांड मंजूर-

हैदराबाद पोलिसांनी बुधवारीच स्टिव्हच्या ट्रांझिट रिमांडसाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, स्टिव्हची तब्येत खालावल्याने त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात भरती केले होते. गुरुवारी त्याची गोमेकॉत वैद्यकीय चाचणी केल्यानंतर डॉक्टरांनी स्टिव्ह प्रवास करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगितले. हा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला.

John Stephen D'Souza
Goa Crime: मडगाव रेल्वे स्टेशनवर थरार; पर्यटक तरुणाने कापला स्वतःचाच गळा

आज हैदराबादला रवाना-

कोर्टात युक्तिवाद सुरू असतानाच स्टिव्हला अस्वस्थ वाटू लागल्याने तो बाकावर कोसळला. पोलिस व इतरांनी त्याची विचारपूस केली. काही वेळानंतर तो शुद्धीवर आला. स्टिव्हला रुग्णवाहिकेतून जिल्हा इस्पितळात नेले. शुक्रवारी सकाळी पोलिस स्टिव्हला विमानाने हैदराबादला घेऊन जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com