Goa Beach: समुद्र लाटांशी जीवघेणा खेळ थांबेना! पर्यटक पोलिसांचे लक्ष कुठे?

Goa: पर्यटकांकडून बेशिस्तीचे दर्शन पुन्हा पुन्हा घडू लागले आहे.
Anjuna Beach
Anjuna BeachDainik Gomantak

Anjuna: जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून बेशिस्तीचे दर्शन पुन्हा पुन्हा घडू लागले आहे. काल पुन्हा एकदा हणजूण किनाऱ्यावर वाळूमध्ये कार अडकण्याचा प्रकार घडला. भाडेपट्टीवर कार घेऊन हे पर्यटक रात्री उशिरा समुद्र किनाऱ्यावर गेले असता ती वाळूत अडकली. सकाळी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. हल्लीच्या काळात घडलेला हा तिसरा प्रकार आहे.

राज्यात येणारे पर्यटक भाडेपट्टीवर गाडी घेऊन फिरतात. परंतु बेशिस्तपणे वाहन चालवण्याचे प्रकार पर्यटकांकडून घडत आहेत. राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर वाहन चालवणे बेकायदेशीर आहे. तरीही पर्यटकांकडून असे प्रकार वारंवार घडत आहेत. यापूर्वी वागातोर आणि मोरजी येथेही असाच प्रकार घडला होता.

Anjuna Beach
Goa Petrol Price Today| गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले? जाणून घ्या आजची स्थिती...

राजधानी पणजीतही पदपथावर गाडी उभी करण्याचे प्रकार पर्यटकांकडून झाले होते, अशा तक्रारी आता सोशल मीडियावर मांडल्या जात आहेत. यापूर्वी एक कार किनाऱ्यावरील पाण्यामध्ये वाहून जाण्याच्या स्थितीत होती. मात्र, दुसऱ्या वाहने खेचून ती बाहेर काढण्यात आली.

1. बंदी असतानाही वारंवार किनाऱ्यावर वाहनेे घेऊन फिरणाऱ्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर दिसतात. त्यात हल्लीच्या काळात वारंवार असे प्रकार घडत असताना पर्यटक पोलिस करतात तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Anjuna Beach
Judo Competition: आंतरमहाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत डीएम्स महाविद्यालयाची बाजी

2. किनाऱ्यावर वाहन अडकण्याच्या तिन्ही घटना उत्तर गोव्यात घडल्या आहे. उत्तर गोव्यात अनेक प्रसिद्ध किनारे आहेत. त्यामुळे येथे पर्यटक पोलिस उपस्थित असणे अपेक्षित आहे. वारंवार असे प्रकार घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com