Goa News: धक्कादायक! डिचोलीत एका शालेय मुलाचा अपहरणाचा प्रयत्न

Bicholim: साखळीतील या प्रकाराने पालक भयभीत झालेले आहेत.
Goa Crime news
Goa Crime newsDainik Gomantak

Bicholim: लहान मुलांचे अपहरण करण्याच्या घटना घडत असल्याच्या बातम्या समाजमाध्यमावर फिरत असतानाच काल शनिवारी साखळीत एका शालेय मुलाचे अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांपर्यंतही हे प्रकरण गेले आहे. मुलाचे अपहरण झाले नसले, तरी या प्रकारामुळे साखळी परिसरात प्रचंड खळबळ माजली असून, पालक भयभीत झालेले आहेत.

Goa Crime news
Goa Police: युवकाचे अपहरण करून खूनाची धमकी, जबरदस्ती ATM मधून पैसेही काढले

साखळी शहरातील एका माध्यमिक शाळेत काल दुपारी दोन अनोळखी व्यक्ती आल्या. मुलाचे नाव सांगून त्याला घरी नेण्यासाठी आल्याचे सांगताच शाळा सुटायला अजून वेळ आहे असे शाळेच्या शिपायाने त्यांना सांगितले.

दरम्यान, नंतर त्या व्यक्ती निघून गेल्या. मागाहून असे कळले की, त्या अनोळखी व्यक्ती ज्या मुलाला नेण्यासाठी आल्या होत्या, तो मुलगा काल शाळेत आलाच नव्हता. त्यानंतर मात्र खळबळ माजली. मुलगा गैरहजर आणि त्याला नेण्यासाठी अनोळखी व्यक्ती शाळेत येणे, यामुळे वेगवेगळे मतप्रवाह पुढे आले.

Goa Crime news
Sonali Phogat case : सावंत सरकारने पुरावे नष्ट केले, सरदेसाईंचे आरोप

संशयाला पुष्‍टी: त्या अनोळखी व्यक्ती त्या मुलाचे अपहरण करण्याच्या इराद्यानेच शाळेत आले होते असा संशय निर्माण झाला. एकंदरीत हा प्रकार पाहता अपहरणाच्या संशयास पुष्टी मिळत आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने डिचोली पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रसंग सांगितला.

तसेच, नंतर पोलिसांनी शाळेत जाऊन तपास केला. मात्र या प्रकारामुळे पालक भयभीत झाले असून, सकाळी आणि दुपारी शाळेच्या परिसरात पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com