Anjuna Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs News: गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटसंबंधी केरळच्या युवकास अटक; आणखी परप्रांतीय सापडण्याची शक्यता

Pede Anjuna Crime News: पेडे-हणजूण येथील जर्मन बेकरीजवळ अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने केरळच्या धीरज मॅथ्यू (३०) याला अटक केली. त्याच्याकडून कोकेन, डायमिथाईलट्रिप्टामाईन (डीएमटी) व चरस मिळून सुमारे २.५० लाखांचा ड्रग्ज जप्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Kerala Man Arrested for Drug Possession At Goa Anjuna

पणजी: पेडे-हणजूण येथील जर्मन बेकरीजवळ मंगळवारी (ता.१५) मध्यरात्रीच्या सुमारास अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने केरळच्या धीरज मॅथ्यू (३०) याला अटक केली. त्याच्याकडून कोकेन, डायमिथाईलट्रिप्टामाईन (डीएमटी) व चरस मिळून सुमारे २.५० लाखांचा ड्रग्ज जप्त केला.

कक्षाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता, त्यामधीलच हा साथीदार असून आणखी काही परप्रांतीय व स्थानिक या रॅकेटमध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

अमलीपदार्थविरोधी कक्षाने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाच्या फ्लॅटवर छापा टाकून सुमारे एक कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला होता. त्याबाबत चौकशी केल्यानंतर संशयित धीरज मॅथ्यू हा हणजूण येथे फ्लॅटवर राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री मॅथ्यूच्या हणजूणयेथील भाडेपट्टीवरील फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. त्याच्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये ३.५ ग्रॅम डीएमटी, २० ग्रॅम चरस व २० ग्रॅम कोकेन सापडले.

संशयित धीरज हा मूळचा कोझिकोड केरळ येथील असून गेल्या दहा वर्षांपासून तो गोव्यात आहे. यापूर्वी त्याला एलएसडी ड्रग्जप्रकरणी केरळ पोलिसांनी अटक केली होती.

‘डीएमटी’पासून सावधान

‘डीएमटी’ हा ड्रग्ज हा आरोग्यास धोकादायक आहे. त्याचा वापर काही आध्यात्मिक सोहळ्यांसाठी केला जातो. या ड्रग्जचे इतर झाडापाल्याच्या औषधांमध्ये मिश्रण केले जाते; त्यामुळे त्याची नशा येते. त्यामुळे अशा ड्रग्जपासून लोकांनी सावध राहावे. त्याचा वापर सोहळ्यासाठी किंवा त्याची जाहिरात केली जात असल्यास त्यावर नजर ठेवण्यात यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बोरी पूल वाहतुकीस दोन दिवस राहणार बंद

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

Bicholim: ..आणखी कितीजणांचे 'बळी' जाण्याची वाट पाहणार? व्हाळशीतील अपघात टाळण्यासाठी मागणी; जंक्शन ठरतेय मृत्यूचा सापळा

Valpoi: 'रस्ता, गटार किमान 5 वर्षे टिकावेत'! वाळपईवासीयांचे मत, भूमिगत केबल्सची कायम स्वरुपी व्यवस्थेची मागणी

IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT