Driver arrested for accident in Goa Dainik Gomantak
गोवा

अपघातप्रकरणी टेंपो चालकाला बेड्या ठोकल्या

खांडोळा - आमोणे पुलाजवळ शनिवारी रात्री झालेल्या जीवघेण्या अपघातप्रकरणी फोंडा पोलिसांनी ओमलिंग प्रभूलिंग मंतगी याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा : खांडोळा - आमोणे पुलाजवळ शनिवारी रात्री झालेल्या जीवघेण्या अपघातप्रकरणी फोंडा पोलिसांनी ओमलिंग प्रभूलिंग मंतगी (वय 35) याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ओमलिंग हा मूळचा गुलबर्गा - कर्नाटक येथील असून सध्या तो साखळी येथे राहतो. टेंपो आणि मोटारसायकल यांच्यात हा अपघात झाला होता. त्यात दुचाकीस्वार मदन डिसोझा हा ठार झाला होता.

दुचाकीवरील अन्य एक स्वार विकास विठ्ठलप्पा रनहळगी ( वय 20) हा बेळगाव येथील युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. निष्काळजीपणे टेंपो चालवल्याने हा अपघात झाल्याने टेंपोचालक ओमलिंग मंतगी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT