Triton Cameras for Coastal Security At Goa
पणजी: गोवा राज्य आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, वाढते पर्यटक आणि समुद्राच्या अनपेक्षित हालचालींमुळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘दृष्टी’ने किनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्थेत एक क्रांतिकारी बदल घडवून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘ट्रिटन’ कॅमेरे बसविले आहेत. मिरामार समुद्र किनाऱ्यावर सौर ऊर्जेवर चालणारे ८ ‘एआय’ कॅमेरे आणि आगोंद समुद्रकिनाऱ्यावर ४ ‘एआय’ कॅमेरे बसवले आहेत.
दृष्टी मरीनने विकसित केलेले एआय ‘ट्रिटन’ कॅमेरे, समुद्रकिनाऱ्यावरील पाण्यातील संभाव्य धोक्यांचे निरीक्षण करणार आहेत. हे कॅमेरे सौर ऊर्जेवर चालणारे आहेत. ट्रिटन कॅमेरे पाण्यातील हालचालींचे सतत निरीक्षण करणार आहे.
जर एखादी व्यक्ती बुडत असेल, तर कॅमेरा त्याच्या हालचालींचे विश्लेषण करून बचाव पथकांना त्वरित सूचना देणार आहे. यामुळे बचाव कार्य अधिक प्रभावीपणे आणि वेगाने होऊ शकते.
बुडण्याच्या घटनांमध्ये प्रत्येक क्षण हा मौल्यवान असतो. ट्रिटन कॅमेऱ्यांमुळे बचाव पथकाला त्वरित माहिती मिळणार असून वेळ न दवडता लगेच जीवरक्षकाला बुडणाऱ्यांना वाचवणे शक्य होईल.
जीवरक्षकांची नजर कधीकधी चुकू शकते, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सिस्टम अधिक अचूक असल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसून येण्याची अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.