Down Syndrome Day Dainik Gomantak
गोवा

ढवळीत डाऊन सिंड्रोम दिवस उत्साहात

स्पर्धेमध्ये गोव्यातील दहा विशेष शाळांनी सहभाग घेतला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: लोकविश्वास प्रतिष्ठान, ढवळी, फोंडा - गोवा येथे जागतिक डाऊन सिंड्रोम दिवसाचे सोमवार दि. 21 रोजी औचित्य साधून गोव्यातील विशेष शाळेतील 12 वर्षाखालील डाऊन सिंड्रोम विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये गोव्यातील दहा विशेष शाळांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांतान फर्नांडिस, उप-संचालक, समाज कल्याण खाते, गोवा राज्य, हे उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून तीन वेळा राष्ट्रीय दिव्यांग कुशल कर्मचारी पुरस्कार विजेता, इंडियन स्पीकर, इंटरनॅशनल सेलिब्रेटी, ग्रंथपाल सहाय्यक, डी.के.टी. इंजिनिअरिंग कॉलेज, इचलकरंजी, कोल्हापूर येथील प्रथमेश दाते उपस्थित होते.

लोकविश्वास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष, अनुप प्रियोळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच सचिव सौ. सविता देसाई यांनी प्रथमेशचे आई बाबा शारदा व यशवंत दाते यांची मुलाखत घेतली. ज्यामुळे विशेष मुलांच्या पालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रयत्न करण्यात आला.यावेळी सविता देसाई लिखित "शोध आणि बोध दिव्यांगाचा" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण अविनाश पारखे व मंदार जोग यांनी केले.स्पर्धेचे सूत्रसंचालन कुष्टा सोलयेकर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी कामत यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मोरे यांनी आभार मानले.

वेशभूषा स्पर्धेत जुनेद व परविन काजी प्रथम

वेशभूषा स्पर्धेत लोकविश्वास प्रतिष्ठानची विशेष शाळा, ढवळी,फोंडा या शाळेतील कु. जूनेद काजी व त्याची आई परविन काजी यांना प्रथम पारितोषिक, केशव सेवा साधना विशेष शाळा, वाठादेव, डिचोली शाळेतील कुमारी. श्रेया गोवेकर व त्याची आई वसुंधरा गोवेकर यांना दुसरे पारितोषिक तसेच आनंद निकेतन विशेष शाळा, म्हापसा शाळेतील कुमार आर्यन गोवेकर व त्याची आई आराधना गोवेकर यांना तृतीय पारितोषिक मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

SCROLL FOR NEXT