Hill cutting
Hill cuttingDainik Gomantak

मायणा-सडयेतील डोंगरकापणी थांबवा

अन्यथा रस्त्यावर उतरू: शिवसेनेचा इशारा; प्रशासनाला 24 तासांची मुदत
Published on

शिवोली: राज्यात सरकार अद्याप स्थापन झालेले नाही, तसेच शासकीय यंत्रणा ठप्प झाल्याची संधी साधत मायणा-सडये येथील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी चालली आहे. याभागात आतापर्यंत शेकडो झाडांची कत्तल झाल्याचे याभागाची पाहणी केली असता दिसून आले. दरम्यान, चोवीस तासात स्थानिक पंचायत तसेच संबंधित खात्याकडून ही डोंगरकापणी बंद न केल्यास गांवकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरू,असा इशारा शिवसेनेचे स्थानिक नेते उमेश केरकर यांनी दिला आहे.

Hill cutting
खनिज वाहतूक विरोधात मयेवासी पुन्हा आक्रमक

दरम्यान, सडये पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक 247/1 येथील डोंगरमाथ्यावर नागरी वस्तीपासून दूरवर असलेल्या वनक्षेत्रात गेल्या डिसेंबर महिन्यापासून हा प्रकार चालला होता परंतु राज्यातील निवडणुकांचा गोंधळात दंग असलेल्या गांवकऱ्यांचे या गोष्टीकडे वेळीच लक्ष न गेल्याने राष्ट्रीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या दिल्लीस्थित धेंडाकडून आतापर्यंत डोंगराचा अर्धाअधिक भाग जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते उमेश केरकर यांनी दै. गोमन्तकशी बोलताना दिली. दरम्यान, यासंबंधात स्थानिक पंचायत कार्यालयात चौकशी केली असता सरपंच लियो डिसौझा यांनी आपल्याला याबाबत माहीत नसल्याचे सांगून हात कानावर ठेवल्याचे केरकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सामान्य माणसांसाठी एक न्याय तर गर्भश्रीमंत बिल्डरांसाठी दुसरा, ही तफावत यापुढे स्थानिक ग्रामस्थ कदापि सहन करणार नाहीत,असे केरकर यांनी सांगितले. मायणा सडयेत चाललेल्या डोंगरकापणीमुळे एका विशिष्ट पंथाच्या स्थानिक धर्मगुरूंनीही जोरदार आक्षेप घेतला असून स्थानिक गांवकऱ्यांच्या नाकावर टिच्चून खुलेआम चाललेली मायणा-सडयेतील डोंगरकापणी तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे

Hill cutting
मडगाव बसस्थानकावरील स्टॉल हटविण्याचा आदेश

येथील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक झऱ्यांचे पाणी उपलब्ध असल्याने देशी विदेशी पक्षांचे थव्याचे थवे वर्षाच्या बाराही महिने ठाण मांडतात.परंतु डिसेंबर महिन्यापासून याभागात डोंगरकापणीसाठी मोठमोठ्या मशीन्स कार्यरत असल्याने बहुतेक पक्षांनी स्थलांतर केले आहे. राज्यातील सरकार एकाबाजूने जैव विविधतेचे संरक्षण करण्याच्या गोष्टी करत आहे, तर दुसऱ्या बाजूने जैव विविधतेचा विनाश करण्यासाठी परप्रांतीय बिल्डरांना अभय देण्याचे काम करत आहे.

- पीटर डिसौझा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com