Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कन्नडिगांबाबत द्वेष नको : साळकर

गोव्यात कन्नडिगांबरोबर इतर राज्यातील लोक नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी अनेक वर्षापासून वास्तव्य करून आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्को : काही राजकीय व्यक्ती गोव्यात राहणाऱ्या कानडी लोकांना गोव्याबाहेरील अशा प्रकारचे शब्द वापरून भेदभाव करून लोकांत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून गोव्यात कन्नड भाषकच नव्हे, तर अनेक वर्षापासून देशातील विविध राज्याचे नागरिक वास्तव्य करून आहेत.

तसे सर्वजण कोणताही भेदभाव न करता एकोप्याने राहतात. मनोज परबसारख्या राजकारण्याने असे द्वेषाचे राजकारण करू नये. परब भारताचे संविधान न मानणाऱ्यातले आहे. असा भेदभाव केला तर भविष्यात दुसऱ्या राज्यात शिक्षण नोकरी व्यवसायासाठी असलेल्या गोवेकरांना त्रास होऊ शकतो असे वास्को चे आमदार कृष्णा साळकर यांनी रेवोल्युशनरी गोवन्सचे परब यांना ते सोशल मीडियावर घालत असलेल्या संदेशाला सडेतोड उत्तर दिले.

हेडलँड सडा येथे एका कार्यक्रमात वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांना याविषयी छेडले असता त्यांनी त्याचे उत्तर दिले. मनोज परब यांनी आमदार साळकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर घातलेल्या संदेश बाबतीत पुढे बोलताना साळकर म्हणाले, एका पक्षाच्या नेत्याने इतकी खालची पातळी गाठून आपला दर्जा सिद्ध केला आहे. परबसारख्या नेत्याने गोव्याबाहेरील लोक असे वक्तव्य करणे बंद करावे. परब द्वेषाचे राजकारण खेळत आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. गोव्यात कन्नडिगांबरोबर इतर राज्यातील लोक नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी अनेक वर्षापासून वास्तव्य करून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT