GOA Board SSC Result 2022 : गोव्यात दहावीचा निकाल कसा पाहाल ?

दहावीचा निकाल आज बुधवार (ता.1 जून) रोजी जाहीर होणार आहे.
Check goa SSC result today
Check goa SSC result todayDainik Gomantak
Published on
Updated on

GOA Board SSC Result 2022 : गोवा शालांत मंडळाने गेल्या एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावीचा निकाल आज बुधवार (ता.1 जून) रोजी जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. दहावीचा हा निकाल संध्याकाळी 5:30 वाजता ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. दरम्यान अनेक विद्यार्थी आणि पालक निकाल पाहण्यास उत्सुक आहेत.

Check goa SSC result today
बेकायदेशीर धर्मांतर करणारे लोक गोव्याच्या बाहेरून येतात : मायकल लोबो

दहावीचा निकाल कुठे जाहीर होणार ? (GOA Board SSC Result 2022)

निकालाची घोषणा होताच तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.gbshse.info तो उपलब्ध असेल.

निकाल किती वाजता जाहीर होणार ?

दहावीचा निकाल आज बुधवार (ता.1 जून) रोजी संध्याकाळी 5:30 वा. जाहीर होणार आहे.

निकाल पाहण्याची प्रकिया काय ?

1. GBSHSE च्या अधिकृत वेबसाइट gbshse.gov.in भेट द्या.

2. Goa Board class 10 Result या पर्यायावर क्लिक करा.

3. लॉगिन विंडोमध्ये प्रवेशपत्रात नमूद केलेले आसन क्रमांक लिहा.

4. “Get Results” या पर्यायावर क्लिक करा.

Check goa SSC result today
गोव्यात पर्यटकांची सतावणूक; तीन महिलांना अटक

गोव्यात किती मुलांनी दहावीची परीक्षा दिली ?

परीक्षेला एकूण 20,572 मुले बसली होती. त्यामध्ये 10,530 मुले तर 10,042 मुलींचा समावेश होता. दहावीची परीक्षा 31 परीक्षा केंद्र व 173 उपकेंद्रावर घेण्यात आली होती.

गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 92.66 टक्के लागला. यंदाही बारावीच्या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली असून 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.66 टक्के आहे. शिक्षण मंडळाने यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांत 18 केंद्र आणि 72 उपकेंद्रांवर घेतली होती. यासाठी राज्यभरातून 18 हजार 201 विद्यार्थी बसले होते. यापैकी कला शाखेमध्ये 4 हजार 754, वाणिज्य शाखेत 5 हजार 496, विज्ञान शाखेत 5 हजार 77 तर व्यावसायिक शाखेमध्ये 2 हजार 874 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com