मोठी बातमी; गोव्यातील कथित धर्मांतर प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे

म्हापसा पोलिसांकडून डॉम्निक डिसोझाला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.
Goa News
Goa NewsDainik Gomantak

गोव्यातील कथित धर्मांतर प्रकरणाचा पुढील तपास आता क्राईम ब्रांच करणार आहे. म्हापसा पोलिसांकडून डॉम्निक डिसोझाला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली असली तरी त्याच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे, कारण क्राईम ब्रांच या प्रकरणाचा आता नव्याने तपास करणार आहेत. (Crime branch to investigate alleged conversion case in goa)

Goa News
गोव्यात दहावीचा निकाल कसा पाहाल ?

बिलिव्हर्स पंथीय धर्मगुरूच्या नावाखाली जादूटोणा व आमिष दाखवून राज्यातील लोकांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडणाऱ्या डॉम्निक डिसोझा ई मास्कारेन्हस याला निधी पुरवठा करणाऱ्यांची सखोल चौकशी करून पर्दाफाश करावा. त्यांच्या सडये - शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स’ मोडण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी समाज कार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Goa News
पर्यटक लुबाडणुकीनंतर पोलिसांची मोहीम तीव्र

राज्यातील सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकांच्या धार्मिक उत्सवातही मिळून मिसळून सहभागी होत आहेत. येथील धार्मिक सलोखा कायम आहे. गोव्यातील कुठल्याही चर्चमधून धर्मांतर होत असल्याची प्रकरणे आतापर्यंत ऐकिवात आलेली नाहीत. त्यामुळे राज्यात धर्मांतर विरोधी कायदा अथवा विधेयक संमत करून घेण्याची मुळीच गरज नाही. प्रोटेस्टंट अथवा बिलीव्हर पंथांकडून असे प्रकार होत असतील परंतु त्यांचा कॅथलिक चर्च संस्थेशी काहीच संबंध नाही, असे व्यक्तव्य विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com