Ayurvedic Neuro Therapy Medical Camp Gomantak Digital Team
गोवा

न्यूरो थेरपी शिबिराची सांगता; मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

श्रीपाद नाईक यांची उपस्थिती : मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा : मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा आणि डॉ. मनोज शर्मा यांच्या आयुर्वेद न्यूरो हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोटा-राजस्थान याच्या संयुक्त विद्यमाने बेतकी- खांडोळा येथे ‘बीग बी’ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिराची सांगता आज झाली. ६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आज शेवटच्या दिवशी बाराशेच्या आसपास रुग्णांची नोंद झाली.

24 मेपासून सुरू झालेल्या या शिबिराच्या समारोपाला केंद्रीय मंत्री तथा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून तर कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे खास अतिथी म्हणून उपस्थित होते. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे हे अशा प्रकारचे आतापर्यंतचे नववे शिबिर असून आतापर्यंत जवळपास 40 ते 45 हजार रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतलेला आहे.

व्यासपिठावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या डीन डॉ. सुजाता कदम, डॉ. मनोज शर्मा, डॉ. वेणू शर्मा, सांडू फार्मसिटिकल्सचे उमेश सांडू, गोवा पर्यटन महामंडळाचे पीआरओ दीपक नार्वेकर, बेतकी आरोग्य केंद्राच्या अधिकारी श्रीमती ब्रँडा पिंटो, उपेंद्र तिंबले, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष सिद्धेश नाईक,

भाजपाचे प्रियोळ मंडळ अध्यक्ष दिलीप नाईक, बेतकी-खांडोळाचे सरपंच विशांत नाईक, उपसरपंच हर्षा गावडे, तिवरे-वरगांवचे सरपंच जयेश नाईक, वेरे-वाघुर्मेच्या सरपंच शोभा पेरणी, बेतकी-खांडोळाच्या उपसरपंच संजिवनी तळेकर, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, डॉ. गोविंद काळे, शिवा नाईक डॉ. शिवानंद पाटील, डॉ. संगिता किर्लोसकर, डॉ. संदीप सावंत उपस्थित होते.

दरम्यान, प्रियोळचे भाजप मंडळ अध्यक्ष दिलीप नाईक यांनी समारोपाच्या कार्यक्रमप्रसंगी स्वागत केले, मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे सचिव सुरज नाईक यांनी यांनी आभार मानले. प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

डॉक्टरांचा गौरव :

गोविंद गावडे यांनी मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक करताना अशा प्रकारच्या शिबिरांची गरज असल्याचे नमूद केले. डॉ. मनोज शर्मा आणि डॉ. वेणू शर्मा यांचा याप्रसंगी त्यांच्या विशेष योगदानाबद्दल शाल आणि मानचिन्ह देऊन कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरात अथक परिश्रम घेतलेल्या व रुग्णांची मनोभावे सेवा केलेल्या डॉक्टरांचा शाल, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT