Khandola Temple Theft : खांडोळा देवस्थानमधील चोरीला सचिव व मामलेदार जबाबदार; भाविकांचा आरोप

त्वरित कारवाईची सरकारकडे मागणी
Robbery at Khandola Ganesha Temple Goa
Robbery at Khandola Ganesha Temple GoaDainik Gomantak

पणजी : खांडोळा येथील महागणपती देवस्थानमधील चोरीला देवस्‍थान समितीचे सविच, फोंडा तालुक्यातील देवालय प्रशासक तथा फोंड्याचे मामलेदार जबाबदार आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली. त्यामुळे सरकारने सचिवाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करून मामलेदाराला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी देवस्थानचे भाविक महेश दत्ताराम नायक व संजीव वेलिंग यांनी केली.

Robbery at Khandola Ganesha Temple Goa
Goa Entertainment Society : गोवा मनोरंजन सोसायटीकडून चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू

पणजीतील पत्रकार परिषदेत महेश नायक म्हणाले, की देवस्थानांच्या व्यवहारांची प्रत्येक तीन महिन्यांनी माहिती घेण्याची गरज असते. मात्र, या देवस्थानला मामलेदाराने कधी भेटही दिली नाही. या समितीकडे देवस्थानकडे व देवाच्या मूर्तीवर असलेले सोन्याचे व चांदीच्या दागिन्यांबाबतची माहिती नोंद केलेली यादी नाही.

दरम्यान, फोंड्यात बुधवारी रात्री झालेल्या चोरीच्या घटनांनी संपूर्ण गोवा हादरलेलं असतानाच पोलिसांना तपासात यश आलं आहे. फोंड्यात उसगाव तिस्क परिसरात चोरट्यांनी एटीएम लुटीसाठी वापरलेली कार पोलिसांनी शोधून काढली आहे. फातोर्ड्यातील वेस्टर्न बायपासवर गांधी रोडवर ही ओमनी कार पार्क केलेली पोलिसांना आढळून आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com