Khandola Temple Theft : खांडोळा गणेश मंदिरातील चोरीचा तब्बल तीन महिन्यांनी लागला छडा

फोंडा पोलिसांनी याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपी संतोषकुमारला रिमांडसाठी पोलिसांनी कोर्टापुढे हजर करण्यात केलं आहे.
Khandola Temple Theft | Goa Crime
Khandola Temple Theft | Goa CrimeDainik Gomantak

Khandola Temple Theft : फोंडा तालुक्यात असलेल्या खांडोळा महागणपती देवस्थान चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल तीन महिन्यांनी चोरीचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश आलं आहे. संतोषकुमार परमानंद दास (वय 42 रा.ओडिशा) असं मुख्य आरोपीचं नाव असून त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

आरोपी संतोषकुमारला पणजी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता त्याने फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत खांडोळा येथे गेल्या 17 ऑगस्ट रोजी महागणपती देवस्थानात चोरी केल्याची कबुली दिली. फोंडा पोलिसांनी याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपी संतोषकुमारला रिमांडसाठी पोलिसांनी कोर्टापुढे हजर करण्यात केलं आहे.

Khandola Temple Theft | Goa Crime
Khandola Temple Theft : खांडोळा देवस्थानमधील चोरीला सचिव व मामलेदार जबाबदार; भाविकांचा आरोप

खांडोळा येथील प्राचीन श्री गणेश मंदिरावर 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दरोडा खालून मंदिरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. मूर्तींची प्रभावळ, मुकुट, हात, एका पायाचे पाऊल, अक्षयपात्र, सूर्य, चंद्र प्रतिमा, रथाचे काही साहित्याही घेऊन चोरट्ये पसार झाले. ही घटना मध्यरात्री घडली होती. 5 ते 10 लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर तीन महिन्यांनी पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Khandola Temple Theft | Goa Crime
Goa Crime : खांडोळा गणेश मंदिरात चोरी; लाखोंची मालमत्ता लंपास

चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या कड्या तोडून आतील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली. त्यानंतर त्यांनी मंदिरातील मौल्यवान सोने, चांदीचे दागिणे व इतर मूर्तींचे सजावट साहित्यांची चोरी केली. मंदिराचा संग्राह्य रुम (स्टोररूम) फोडून तेथील बरेच साहित्य उचलले . तर काही साहित्य मंदिराच्या बाहेर फेकून दिले.

चोरट्यांना मुख्य दरवाजा फोडून ते आत गेले असून बाहेर पडताना दुसरा दरवाजा तोडून बाहेर आले. उत्तरेकडील दरवाजातून ते बाहेर पडले असून उत्तरेकडील फाटकाजवळ दोन कळशा, चौरंग आणि काही साहित्य, फंड पेटीतील रक्कम टाकून चोरटे पसार झाल्याचे तपासात दिसून आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com