मोरजी: तुमचा आमदार तुम्हाला सोईसुविधा पुरवण्यासाठी कार्यरत असताना काही जण विद्यार्थ्यांच्या (Students) सुविधाकडे आडकाठी आणत असतात. इन्टरनेट (Internet सेवा मतदार संघात पुरवताना केबल घालत असताना काही जण हिरो होण्यासाठी खालच्या पातळीवर जावून काम करतात व केबल अडवतात, हरमल येथेही असाच प्रकार काही नेतेगिरी करणारे नेते करतात त्यांनी जर केबल अडवला तर सरकारी यंत्रणा आणि पोलीस तयार आहेत. त्यांच्यावर कारवाई करायला आणि कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी मोरजी येथील श्री कळसदेव मांगर सभाग्रह येथे विद्यार्थ्यासाठी (Students) मोफत व्हायफाय (wi-Fi) सेवा कार्यरत केली त्याचा शुभारंभ 26 रोजी केला त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर सरपंच वैशाली शेटगावकर, पंच मुकेश गडेकर, तुषार शेटगावकर, पंच विलास मोरजे, पंच प्रकाश शिरोडकर, पंच सुप्रिया पोके, रोटरी क्लब पर्वरीचे सचिव उमेश नाईक, सागर गोवेकर व गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत आदी उपस्थित होते .मोरजी पंचायत क्षेत्रातील गरजू विधार्थ्याना इन्टरनेट सेवा उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला , हि सेवा दोन तास कार्यरत होणार आहे. एकूण एकाचवेळी 52 विद्यार्थी या सेवेचा लाभ घेवू शकतात, कळसदेव मांगर येथे जे विद्यार्थी येवून त्याचा लाभ घेवू शकतात.
दुसऱ्या पंचायतीत हि सेवा
आमदार दयानंद सोपटे यांनी सर्वात प्रथम पार्से पंचायत क्षेत्रात आमदार दयानंद सोपटे यांनी वैयक्तिक पातळीवरून मोफत व्हायफाय सेवा सुरु केल्यानंतर 26 रोजी मोरजी पंचायत क्षेत्रात या सेवेचा शुभारंभ केला .
मोरजीत सुरळीत काम
आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना मांद्रे मतदार संघाचे आमदार हे स्वताच्या घरासाठी किंवा वैयक्तिक पातळीवर हे सेवा स्वतासाठी घेतली नाही, तर विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेवून हि सेवा कार्यरत केली, त्यासाठी केबल घालताना पार्से तुये येथे अडचणी आणल्या, हरमल येथेही काही जण आडकाठी आणत आहेत त्याना इशारा देताना आमदार सोपटे यांनी सांगितले जर या पुढे कुणी आडकाठी आणेल तर पोलीस तयार आहेत एकेकावर कारवाई करण्यासाठी, हि धमकी नव्हे तर इशारा असल्याचे स्पस्ठीकरण आमदार सोपटे यांनी दिला. मात्र मोर्जीवासियांनी कोणतीच आडकाठी आणली नाही .
विधानसभेत प्रश्न मांडणार
इतर गावात हि सेवा विधानसभेचे अधिवेशन झाल्यानंतर सुरु केली जाईल, चालू विधान सभेत मांद्रे मतदार संघाचे प्रश्न मांडले जाणार आहे असे सोपटे म्हणाले .
कमिशन पाहिजे तर सोपटे देणार
पूर्वी मतदार संघात इन्टरनेट सेवा सुरु करण्यासाठी केबल घालण्याचे काम सुरु होते काही ठिकाणी अडवले, विविध प्रश्न त्या नेत्यांनी विचारले, किती कमिशन मिळाले, आमदाराला किती कमिशन दिले असे प्रश्न नेतेगिरी करणाऱ्यांनी कंत्राटदाराला विचारले व आता हरमल येथे कामाला आडकाठी आणली जाते. हि जनसेवा आणि विधार्थ्यांच्या शिक्षणासाठी सेवा आहे, त्याचे आमदाराला कमिशन नको, जे कोण आडकाठी आणतात त्याना पाहिजे तर कमिशन मी देतो असे आमदार सोपटे यांनी टोला मारला
विधार्थ्यानी लाभ घ्यावा ; सरपंच
मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी बोलताना या सेवेची अत्यंत गरज विधार्थ्याना होती, हि गरज ओळखून आमदार दयानंद सोपटे यांनी सेवा मोरजीत पुरवल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधार्थ्यानी या ठिकाणी येवून त्याचा लाभ घ्यावा, मात्र त्याचा गैरवापर टाळावा असे आवाहन करत असतानाच दोन्ही हायस्कूलच्या मुख्याध्यापकाना पंचायतीतर्फे पत्र लिहून या योजनेचा लाभ घेण्याचे कळवणार असल्याचे सांगितले .
पर्यटन विकास महामंडळ सुदेश सावंत यांनी प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन केले. रोटरी क्लबचे सागर गोवेकर यांनी या सुविधा विषयी माहिती दिली. शेवटी पंच मुकेश गडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक शेटगावकर, धनंजय शेटगावकर, नयनी शेटगावकर, प्रशांत आजगावकर आदींनी परिश्रम घेतले .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.