Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याची तुलना श्रीलंकेसारख्या जागतिक केंद्राशी करू नका; पर्यटन खात्याचे आवाहन

Goa Tourism Department: गोवा हे भारतातील केवळ एक राज्य आहे तर श्रीलंका हा एक संपूर्ण देश, त्यामुळे एखाद्या देशाच्या आणि राज्याच्या पर्यटनामध्ये तुलना होऊ शकत नाही.

Akshata Chhatre

गोवा: सध्या गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. कोरोना महामारीनंतर या संख्येत मोठी घट झाल्याचं म्हटलं जातंय. सीईआयसीच्या आकडेवारीवरुन याबाबत दावा केला जातोय आणि या अहवालावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी गोव्यातील टॅक्सी माफिया आणि महागड्या हॉटेल्सना दोषी धरले आहे.

यावरच भाष्य करताना गोवा पर्यटन खात्याने गोव्यातील पर्यटनाची तुलना श्रीलंकेसारख्या देशांसोबत करू नये असा आवाहन केले आहे. पर्यटन खात्याच्या मतानुसार गोवा हे भारतातील केवळ एक राज्य आहे तर श्रीलंका हा एक संपूर्ण देश, त्यामुळे एखाद्या देशाच्या आणि राज्याच्या पर्यटनामध्ये तुलना होऊ शकत नाही. मात्र टॅक्सी माफिया आणि महागड्या हॉटेल्सबाबत अद्याप पर्यटन खात्याने मौन सोडलेले नाही.

काही बाजारी घटकांमुळे पर्यटनाचे आकडे बदलतात, किंमत वाढते आणि मग पर्यटक पर्यटनाचे काही इतरत्र पर्याय निवडतात. सध्या गोव्यातून होणारी नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुद्धा यामध्ये भर पाडत आहेत.

उपाय म्हणून गोवा सरकार कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करीत आहे. यामधून राज्य सरकार पर्यटकांसाठी गोव्यातील पर्यटन अधिक सुलभ आणि परवडण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करीत आहे.

गोव्याच्या देशांतर्गत पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे, 2023 मध्ये 8 दशलक्ष पर्यटक गोव्यात आले असल्याचंही पर्यटनखात्याचं म्हणणं आहे. कोरोना महामारीमुळे या आकड्यावर बराच मोठा परिणाम झाला मात्र सध्या राज्यातील पर्यटनाची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Goa Live Updates: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT