Divjotsav Dainik Gomantak
गोवा

Divjotsav In Goa: तोच सण, तोच उत्साह पण पद्धती होताहेत आधुनिक! दिवजोत्सवात पितळी दिव्यांचा वाढता शिरकाव

Divjotsav: चिकणमातीच्या दिवजांची जागा आता पितळ या धातूपासून बनवलेल्या दिवजांनी घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारातही या दिवजांना ''अच्छे दिन'' आले आहेत. दुसऱ्या बाजूने चिकणमातीच्या दिवजांना मागणी कमी असल्याने ही दिवजे बनविण्याचा व्यवसाय मंदावला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Divjotsav In Goa

डिचोली: दिवजोत्सव म्हटला, की पेटते दिवज हातात किंवा डोक्यावर घेवून सुवासिनी देवदेवतांसमोर दीप ओवाळणी करताना दिसून येतात. डिचोलीत गावोगावी साजऱ्या होणाऱ्या दिवजोत्सवाची परंपरा आणि उत्साह आजही कायम असला, तरी बहुतेक भागात या दिवजोत्सवात आधुनिकीकरणाचा शिरकाव झाल्याचे आढळून येत आहे.

चिकणमातीच्या दिवजांची जागा आता पितळ या धातूपासून बनवलेल्या दिवजांनी घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारातही या दिवजांना ''अच्छे दिन'' आले आहेत. दुसऱ्या बाजूने चिकणमातीच्या दिवजांना मागणी कमी असल्याने ही दिवजे बनविण्याचा व्यवसाय मंदावला आहे.

मातीकाम करणाऱ्या स्थानिक कारागीरांनी मातीपासून दिवजे बनविण्याच्या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. बाजारात महाराष्ट्रातील आयी आदी काही भागातून क्वचितच मातीची दिवजे बाजारात उपलब्ध होत असून गावोगावी मंदिरातून दिवजोत्सवाची परंपरा आणि सुहासिनींचा उत्साह कायम आहे.

पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी एक काळ असा होता, की दिवजोत्सवात ''चिकणमाती''चेच दिवज पेटविण्यात येत होते. गावागावात साजरा होणाऱ्या दिवजोत्सवावेळी सुवासीनींच्या हातात मातीपासून बनवलेले ''दिवज'' दिसून येत असे. मात्र काळ बदलत गेला, तशी हळूहळू मातीच्या दिवजांची जागा पितळ धातूपासून बनवलेल्या दिवजांनी घेतली. आता तर बहुतेक सुवासिनी पितळच्या दिवजांचा वापर करताना दिसून येत आहे. पितळच्या दिवजांना मागणी असल्याने या दिवजांचे नवीन मॉडेलही बाजारात येऊ लागले आहेत. सध्या गावोगावी दिवजोत्सवाची लगबग सुरू असून, पितळची दिवजे खरेदीही सुरू आहे.

पितळी दिवज किफायती

गेल्या काही वर्षांपासून सुवासिनी पितळ या धातूपासून बनवलेल्या दिवजांना पसंती देत आहेत. या दिवजांना मागणीही चांगली आहे. बाजारात दरवर्षी दिवजोत्सव काळात या दिवजांना मागणी असते. पितळपासून बनविलेले दिवज किफायतशीर आणि टिकाऊ असते. दरवर्षी नवीन मॉडेलची दिवजे बाजारात येत असतात. असे कारागीर तथा व्यापारी देविदास कारेकर यांनी सांगितले.

मातीच्या दिवजांची प्रथा

पितळचे आकर्षक दिवज बाजारात आली असली, तरी डिचोलीतील काही ठराविक भागात चिकण मातीच्याच दिवजांना धार्मिक महत्व आहे. मये, कुडचिरे आदी काही मोजक्याच ठिकाणी मातीचे दिवज पेटविण्याची प्रथा आहे. आजही या भागात मातीची दिवजे पेटविण्याची चालत आलेली परंपरा कायम आहे. इच्छा असूनही सुवासीनींना अद्यापतरी मातीची दिवजे टाळता येत नाही. असे बाजारात मातीची दिवजे विकणारी प्रभावती कुडासकर या महिलेने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT