Mickky Pacheco Arrest Warrant: हायवे अडवणे माजी मंत्र्याला भोवले! मिकी पाशेको यांच्या अटकेचे आदेश; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

arrest warrant issued against mickky pacheco margao court: रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्ग अडविल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद असलेले माजी मंत्री मिकी पाशेको हे सुनावणीस न्यायालयात हजर झाले नाहीत.
arrest warrant issued against mickky pacheco margao court
Mickky PachecoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सेंट फ्रान्सिस झेवियर यांची निंदा केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करा, अशी मागणी करत रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्ग अडविल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद असलेले माजी मंत्री मिकी पाशेको हे सुनावणीस न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे मडगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी शुभदा दळवी यांनी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले.

या प्रकरणासह पाशेको यांच्या विरोधात माजोर्डा कॅसिनोप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणाचीही न्या. दळवी यांच्या न्यायालयात सुनावणी होती. मात्र, पाशेको हे सध्या हाँगकाँगमध्ये असल्याने ते या दोन्ही सुनावण्यांना हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने त्यांचे वकील ॲड. विवेक नाईक हे न्यायालयात हजर होते. त्यांनी पाशेको हे विदेशात असल्याने त्यांना सुनावणीस गैरहजर राहण्याची सूट द्यावी, असा अर्ज न्यायालयाकडे (Court) केला.

arrest warrant issued against mickky pacheco margao court
Goa Crime Branch: गोव्याच्या सुरक्षेशी खेळ थांबवा! अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावरुन नितीन फळदेसाईंचा हल्लाबोल; गुन्हे शाखेच्या 'त्या' निष्कर्षावर मोठे प्रश्नचिन्ह

मात्र, पाशेको हे यापूर्वीही न्यायालयात सुनावणीस गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्या. दळवी यांनी हा अर्ज फेटाळताना त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. महामार्ग अडविल्याच्या प्रकरणी आरोप निश्चिती करण्यासाठी युक्तिवाद होणार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Woman Cheated 33 lakhs
Instagram Minor Assault Case Panaji
moira bar sword attack case suspects acquitted goa
Goa Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com