Goa Kala Academy: कला अकादमी पुन्‍हा 1 ऑगस्टपासून बंद, IIT मद्रासचा धक्कादायक रिपोर्ट; नूतनीकरण कामाचे निघाले वाभाडे

goa kala academy closing down august 1: आयआयटी मद्रासच्या तांत्रिक अहवालात कला अकादमीच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या नूतनीकरण प्रकल्पात तब्बल १८ प्रमुख त्रुटी आढळून आल्यानंतर संपूर्ण संकुल दुरुस्तीसाठी पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
goa kala academy closing down august 1
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: आयआयटी मद्रासच्या तांत्रिक अहवालात कला अकादमीच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या नूतनीकरण प्रकल्पात तब्बल १८ प्रमुख त्रुटी आढळून आल्यानंतर संपूर्ण संकुल दुरुस्तीसाठी पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नूतनीकरण व सुधारणा कामांसाठी १ ऑगस्टपासून कला अकादमी संकुल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी दिली.

कला अकादमीच्या (Kala Academy) नूतनीकरण कामांचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत आयआयटी मद्रासच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीला फ्रान्सिस कुयल्लो, देविदास आमोणकर आणि सतीश गावस उपस्थित होते.

goa kala academy closing down august 1
Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

विजय केंकरे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात मुख्य सभागृहातील गंभीर त्रुटी दूर करण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाईल. संकुल काही काळ बंद ठेवल्यास प्रशासनाला आवश्यक सुधारणा आणि तज्ज्ञ समितीने निदर्शनास आणलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील. अकादमीतील काही वर्ग, प्रशिक्षण उपक्रम किंवा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सुरू ठेवता येतील का, याबाबतचा अंतिम निर्णय दुरुस्तीच्या कामांचा आराखडा निश्चित झाल्यानंतर घेतला जाईल. तसेच, आवश्यक दुरुस्ती कामांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचनाही टास्क फोर्सने केली आहे.

दरम्यान, कला अकादमीच्या खुले प्रेक्षागृह (ओपन एअर ऑडिटोरियम) नूतनीकरणाच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. या विषयावर टास्क फोर्स आणि संबंधित सरकारी विभागांच्या आगामी बैठकीत पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे.

goa kala academy closing down august 1
Kala Academy: परीक्षक लाचप्रकरणी कला अकादमीच्या अध्यक्ष, सचिवांकडून धक्कादायक उत्तरे! ‘कला राखण’कडून पोलखोल; तपास संथ गतीने

कंत्राटदाराकडून खर्च करणार वसूल

नूतनीकरणासाठी झालेल्या खर्चापैकी सुमारे ८० टक्के खर्च निष्फळ ठरल्याचा दावा टास्क फोर्सने केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करून झालेला खर्च वसूल करण्याची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

F N Souza Hanuman Painting
Goa 97 Voters Electoral Roll
Porvorim elevated road traffic
EPF wage ceiling hike 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com