Goa Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

प्रशासकीय कामामध्ये व्यत्यय; चौघांवर गुन्हा म्हापसा पालिका मुख्याधिकाऱ्यांकडून तक्रार

अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

गाळेवजा दुकान जमीनदोस्त करण्याच्या कामात अतिक्रमण हटाव, दंडाधिकारी व पालिका अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दिली होती.

जुन्या आझिलो इस्पितळाच्या समोरील जीवन कोल्ड्रींक हे जीवन मयेकर यांचे कथित बेकायदेशीररित्या बांधलेले दुकान हटविण्याचा आदेश उत्तर गोवा प्रधान न्यायालयाने दिला होता. सोमवार, २८ रोजी या आदेशाची कार्यवाही पालिकेतर्फे अतिक्रमण हटाव पथक आणि दंडाधिकाऱ्यांच्या हजेरीत हाती घेतली होती. पण त्यानंतर संबंधितांच्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ही कारवाई थांबवली होती.

यासंदर्भात मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. दि. २८ रोजी जीवन उर्फ साबाजी मयेकर यांनी केलेले दुकानाचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची प्रक्रिया नियोजित केली होती. सदर दुकान हटविण्याची प्रक्रिया अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मामलेदार साईश नाईक, वीज कनिष्ठ अभियंता गौरेश गावकर, सांबाखाचे पर्यवेक्षक प्रदीप कांदोळकर, पोलीस अधिकारी , पालिका कनिष्ठ अभियंता संगीता सातार्डेकर, निरीक्षक शेखर गावस, पर्यवेक्षक सुनील नाईक व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केली.

त्यामुळे संबंधित संशयितांवर गुन्हा नोंद करावा, अशी विनंती २९ रोजी पाठवलेल्या या तक्रारी पत्राद्वारे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी म्हापसा पोलिस स्थानकात केली होती. या पत्राची दखल पोलिसांनी घेऊन ही कारवाई केली आहे.

कामात अडथळा

सिध्दार्थ मयेकर, श्रीमती धुरी व विरेंद्र मयेकर (रा. शेट्येवाडा, म्हापसा) यांनी कारवाईत अडथळा आणला. तसेच विरेंद्र मयेकर यांनी आपली महिंद्रा बोलेरो गाडी जाणूनबुजून व चुकीच्या हेतूने दुकानासमोर उभी केली आणि अतिक्रमण हटाव पथकाच्या कामात अडथळा निर्माण केला. अधिकाऱ्यांना कर्तव्य शांततेत पार पाडण्यास प्रतिबंध केला,अशी तक्रार म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी २९ रोजी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT