Mega Block
Mega BlockDainik Gomantak

Mega Block: कुमठा-कुंदापूर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

कुमठा ते कुंदापूर रेल्वे मार्गादरम्यान देखभाल व दुरुस्तीचे काम हातात घ्यावयाचे असल्याने तीन तास मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
Published on

शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी कुमठा ते कुंदापूर रेल्वे मार्गादरम्यान देखभाल व दुरुस्तीचे काम हातात घ्यावयाचे असल्याने दुपारी १.१० ते सायंकाळी ४.१० वा. असे तीन तास मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Mega Block
Super Blue Moon: गोव्यात आज पाहता येणार दुर्मिळ सुपर ब्ल्यू मून

त्यामुळे खालील प्रवासी रेल्वे गाड्यांचे नियमन केले जाईल. ट्रेन क्रमांक १६३३३ थिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस जी गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी सुटणार आहे तिचे रोहा ते कुमठादरम्यान तीन तास नियमन केले जाईल, त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक १२६२० मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक, मत्स्यगंधा एक्सप्रेस, जिचा प्रवास १ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे तिचे सुरतकल ते कुंदापूरदरम्यान दीड तासासाठी नियमन केले जाईल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com