Super Blue Moon: गोव्यात आज पाहता येणार दुर्मिळ सुपर ब्ल्यू मून

Super Blue Moon in Goa: गोव्यात गुरुवार, ३१ रोजी अत्यंत दुर्मिळ दिसणारा असा सर्वात मोठा सुपर ब्ल्यू मून पाहता येणार आहे.
Goa Super Blue Moon 2023:
Goa Super Blue Moon 2023:Dainik Gomantak

Super Blue Moon in Goa: गोव्यात गुरुवार, ३१ रोजी अत्यंत दुर्मिळ दिसणारा असा सर्वात मोठा सुपर ब्ल्यू मून पाहता येणार आहे. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असते.

यात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह त्या वर्षातील इतर पौर्णिमेच्या तुलनेत १४ टक्के अधिक मोठा आणि तेजस्वी दिसतो, अशी माहिती खगोल अभ्यासक सतीश नायक यांनी दिली.

Goa Super Blue Moon 2023:
नव्याने बांधण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पांचे काम ठप्प; पर्यावरण खात्याकडून माहिती

नायक म्हणाले, यावर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये एकूण तीन सुपरमून झाले आहेत. गुरुवारी रात्रीचा पूर्ण चंद्र ऑगस्ट महिन्यातील दुसरा सुपरमून असणार आहे.

या वर्षातील म्हणजेच २०२३च्या सुपरमूनच्या मालिकेतील हा शेवटचा सुपरमून असेल. या घटनेतील नावीन्य हेच आहे की, यात चंद्र हा वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वात तेजस्वी दिसणार आहे.

Goa Super Blue Moon 2023:
जलसंचय करण्यासाठी राज्यात शंभर बंधारे बांधण्याचे नियोजन; 50 जागांची निवड

दरम्यान, उत्तर गोव्यातील खगोलप्रेमींसाठी पणजी येथील सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळा आणि विद्याप्रबोधिनी हायस्कूल पर्वरी येथे गुरुवारी एक निरीक्षण सत्र आयोजित केले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून  पणजी  वेधशाळेत सायंकाळी ७.३० वाजता खगोलीय घटनांच्या गतिशीलतेवर विशेष कार्यक्रम होणार आहे.

दक्षिण गोव्यासाठी हे निरीक्षण रवींद्र भवन  मडगाव  येथे असणार आहे. तिन्ही ठिकाणी हा कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री ९ वा. या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुला व विनामूल्य असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com