Famous Restaurants in Goa Dainik Gomantak
गोवा

Famous Restaurants in Goa: गोव्यातील 'या' 5 रेस्टॉरंटच्या चवीनं अनेकांना लावलंय वेड! सुट्टीच्या दिवशी नक्की भेट द्या

Best restaurants in Goa: गोवा हे फक्त सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही, तर उत्कृष्ट खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. इथल्या रेस्टॉरंट्समध्ये स्थानिक कोकणी, पोर्तुगीज, तसेच आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा अप्रतिम अनुभव घेता येतो.

Sameer Amunekar

गोवा हे राज्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासासाठी प्रसिद्ध असून, येथे विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतींची अनोखी सरमिसळ पाहायला मिळते. महाराष्ट्रीयन, कोकणी, आणि पोर्तुगीज खाद्यपदार्थांचा प्रभाव गोव्याच्या आहारशैलीत स्पष्टपणे दिसून येतो.

गोवा हे स्वादिष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध असून, कोंबडी, मासे, आणि शिंपल्यांचे पदार्थ येथे विशेष आवडीने बनवले जातात. 2025 साली, गोव्याने ईटरच्या 'व्हेअर टू ईट अराउंड द वर्ल्ड' या यादीत सहावे स्थान पटकावले आहे.

गोवा हे खाद्यप्रेमींसाठी एक स्वर्ग असून, येथे स्थानिक पदार्थांपासून ते जगातील कोणत्याही पदार्थाची चव चाखायला मिळते.

कॅव्हॅटिना रेस्टॉरंट (Cavatina Restaurant)

कॅव्हॅटिना रेस्टॉरंट गोव्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. कॅव्हॅटिना रेस्टॉरंट स्थानिक कोकणी पदार्थांपासून ते फ्युजन डिशपर्यंत विविध प्रकारच्या पदार्थांचा आनंद देते.

मेनूमध्ये मासे, सीफूड, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ यांचा समावेश आहे. कॅव्हॅटिना रेस्टॉरंट दक्षिण गोव्यातील बेनॉलिम येथे स्थित आहे, जेथून समुद्रकिनाऱ्याचा आनंदही सहज घेता येतो.

प्राका प्राझेरेस रेस्टॉरंट (Praca Prazeres Restaurant)

हे रेस्टॉरंट आपल्या सुंदर वातावरण, ताज्या स्थानिक पदार्थांवर आधारित मेनू आणि उत्कृष्ट पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिक मसाले आणि आधुनिक पाककृतींचे फ्युजन हे रेस्टॉरंटचे विशेष आकर्षण आहे.

रेस्टॉरंट शांत आणि सुंदर वातावरणात वसलेले आहे, ज्यामुळे जेवणाचा अनुभव अधिक सुखद होतो. गोवन फिश करी, सिझलर प्रॉन्स, आणि क्रॅब मासाला इथे खूप लोकप्रिय आहेत.

तंजोर टिफिन रूम (Tanjore Tiffin Room Restaurant)

या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट नारळ चटणी आणि पारंपरिक तिखट चवीने पदार्थ अधिक खास बनवले जातात. हे गोव्यातील एक अनोखे आणि लोकप्रिय रेस्टॉरंट आहे. दक्षिण भारतीय मेनू या रेस्टॉरंटमध्ये मिळतात.

इसाबेल तपस रेस्टॉरंट (Isabella’s Tapas Restaurant)

हे गोव्यातील खास स्पॅनिश खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट समुद्रकिनारी असल्यामुळे ताज्या वाऱ्यासोबत डिनिंगचा आनंद घेता येतो. कपलसाठी हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.

ग्रम्प्स रेस्टॉरंट (Grumps Restaurant)

कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे रेस्टॉरंट योग्य आहे. या रेस्टॉरंटमधील गोवन फिश करी प्रसिध्द आहे. शाकाहारींसाठीही स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहेत, जसे की पनीर टिक्का, व्हेज बिर्याणी, आणि शाकाहारी पास्ता. काही खास दिवशी किंवा प्रसंगी रेस्टॉरंटकडून विशेष ऑफर्स देण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT