Manish Jadhav
गोव्याचं निसर्ग सौंदर्य अलौकिक आहे. एकदा तरी जीवाचा गोवा केला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं.
गोव्याला तुम्ही रस्ते, हवाई, समुद्री मार्गे जावू शकता. आज या फोटोस्टोरीच्या माध्यमातून पुणे टू गोवा सफरीसाठी रस्ते, हवाई आणि ट्रेनच्या सफरीबद्दल जाणून घेणारोत.
रस्तेमार्गाने पुणे ते गोवा अंतर 454 किमी एवढे आहे. या सफरीमध्ये तुम्ही कोकणातील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटू शकता. तुम्हाला पुण्याहून गोव्याला पोहोचण्यासाठी रस्तेमार्गाने 9 तास 15 मिनिटे लागतात.
पुण्याहून तुम्ही ट्रेनने गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमची ही जर्णी अविस्मरणीय होईल. या जर्णीमध्ये तुम्हाला गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधबा पाहायला मिळतो. पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी ट्रेनने 12 तास लागतात.
पुण्याहून तुम्ही गोव्याला हवाई मार्गाने जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमची सफर यादगार होईल. हवाई मार्गाने पुण्याहून तुम्ही गोव्याला एका तासात पोहोचता.
गोव्याचं विलोभनीय सौंदर्य तुम्हाला भुरळ पाडतं. येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे, धबधबे, किल्ले तुम्हाला आकर्षित करतात.