Subhash Phal Dessai Dainik Gomantak
गोवा

दिव्‍यांग व्‍यक्ती, विद्यार्थ्यांचे हात साकारणार देवतांच्‍या मूर्ती; मिळणार 3 हजार रुपयांचे आर्थिक साहाय्‍य, मंत्री फळदेसाईंची माहिती

Goa: श्री गणेश, श्री सरस्वती व श्री लक्ष्मी देवीच्या मूर्ती बनविण्याचे कौशल्य दिव्यांग व्यक्तींना आत्मसात करता यावे यासाठी विशेष योजना तयार करण्यात येणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: श्री गणेश, श्री सरस्वती व श्री लक्ष्मी देवीच्या मूर्ती बनविण्याचे कौशल्य दिव्यांग व्यक्तींना आत्मसात करता यावे यासाठी विशेष योजना तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केली. पर्वरी येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनमध्ये आयोजित गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यशाळेत एकूण दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. म्हापसा कलाकृती व बालभवन पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योजना पूर्णत्वास जाईपर्यंत दिव्यांग कलाकार व विद्यार्थ्यांना श्री सरस्वती व श्री लक्ष्मी देवींच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रत्येकी रुपये ३ हजारांचे आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्‍या मूर्ती परिसरातील शाळांना सरस्वतीपूजन व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने देणगी स्वरूपात देण्यात येतील, असे फळदेसाई म्‍हणाले.

म्हापसा कलाकृतीच्या प्रेरणा पावसकर यांनी स्वागत केले. यावेळी संजय स्कूलचे लेखाधिकारी पावलो रॉड्रिगीस, बालभवनचे प्रेमानंद कुंभार, संजय स्कूलचे मुख्याध्यापक तातू कुडाळकर उपस्थित होते. दरम्‍यान, स्‍वत:च्‍या हातांनी बनविलेली गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन त्‍यांना भेट दिली.

‘पर्पल फेस्‍त’मध्‍ये मिळणार संधी

दिव्‍यांग विद्यार्थ्यांना ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या पर्पल फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. शैक्षणिक विषय हाताळण्यात अडचण असलेल्या दिव्यांग व्यक्तींना गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून व्यावसायिक समकक्ष प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

योजनेचे स्‍वरूप

  • ३००० रुपयांचे मिळणार साहाय्य

  • मूर्ती शाळांना देणार देणगी स्वरूपात

  • दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळेल ‘पर्पल फेस्‍त’मध्‍ये संधी

  • शिक्षणाऐवजी व्यावसायिक समकक्ष प्रमाणपत्राची सुविधा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT