Goa-Muscat Flight Dainik Gomantak
गोवा

Goa-Muscat Flight: गोवा ते मस्कत थेट विमानसेवेस 29 ऑक्टोबरपासून प्रारंभ; आठवड्यातून चार दिवस उड्डाणे

Akshay Nirmale

Goa-Muscat Flight: गोवा ते मस्कत थेट विमानसेवेला 29 ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे उड्डाण होईल. त्यामुळे आखाती देशांमधून आणखी एक थेट विमानसेवा गोव्यासाठी सुरू झाली आहे.

ओमान एअरतर्फे ही सेवा पुरवली जाणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही फ्लाईट असेल, मस्कत इंटरनॅशनल एअरपोर्टच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे.

प्रवक्तांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातून उड्डाण केलेली पहिली थेट फ्लाईटच्या मस्कतच्या विमानतळावर २९ ऑक्टोबर रोजी 7 वाजून 10 मिनिटांनी उतरेल. तसेच त्याच दिवशी 10 वाजून 10 मिनिटांनी गोव्याकडे उड्डाण करेल.

संपूर्ण नोव्हेंबरपर्यंतच्या काळात आठवड्यातील रविवार, बुधवार, गुरूवार आणि शनिवारी ही विमानसेवा असेल. डिसेंबर महिन्यात ओमान एअर सेवेतर्फे या सेवेत वाढ करण्याची योजना आहे. डिसेंबरमध्ये आठवड्यात सहा दिवस ही सेवा केली जाईल, अशी शक्यता आहे.

दरम्यान, यापुर्वी गल्फ एअर बहारीन मधून गोव्यातील दाबोळी विमानतळावर थेट विमानसेवा सुरू केली आहे. 27 मार्चपासून या सेवेला सुरवात झाली. आठवड्यातील 4 दिवस ही सेवा असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT