साळगाव: भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष दिलीप परुळेकर यांनी आपल्या पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करणार असल्याचे सांगितले. विजयासाठी आपण 200 टक्के प्रयत्न करणार आहे. आपल्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे. गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला चार गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी येत्या चार ते आठ दिवसांत होतील. त्यानंतर आपण कार्यकर्त्यांसह पक्षाच्या कामाला सुरूवात करणार आहे, असे ते म्हणाले.(Dilip Parulekar strives to lead his party to success in the forthcoming Goa Assembly elections)
या अनुषंगाने बोलताना परुळेकर म्हणाले की, दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये Goa BJP प्रवेश केलेल्या नेत्याला साळगाव मतदारसंघाची Saligao Constituency उमेदवारी दिल्याने मूळ कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली नाराजी अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी घालविण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. तसेच जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना कामाला लावावे लागेल. नुसते मतदारसंघात फिरून उपयोगाचे नाही.
पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर तातडीने तुमच्यावर कोणती जबाबदारी आली आहे असे विचारले असता परूळेकर यांनी सांगितले की, बार्देश तालुक्यातील कळंगुट, म्हापसा, साळगाव, पर्वरी Porvorim या मतदारसंघांवर आपल्याला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने आपल्याला आपला साळगाव मतदारसंघ सर्वांत महत्वाचा आहे आणि त्यासाठी पहिले कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाबरोबर राहण्यासाठी उद्युक्त करण्याचे.
दहा ते बारा हजार नोकऱ्यांची निर्मिती
कोणतेही सरकार आले तरी सर्वांचेच समाधान करणे शक्य नसते. लोकांना पाणी, वीज, आरोग्य सुविधा, चांगले रस्ते व अन्य साधनसुविधा देणे हे अत्यावश्यक असते. आतापर्यंत या गोष्टी साध्य झाल्या आहेत त्या केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्यामुळेच. आता आमचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर योग्य संख्येने युवकांना नोकऱ्या मिळतील. सावंत सरकारने दहा ते बारा हजार नोकऱ्यांची निर्मिती केलेली आहे, असे परुळेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.