Goa Tourist: राज्यात पर्यटकांचा ओघ ओसरतोय!

कळंगुटसह किनारे ओस: शॅक्स,रेस्टॉरंटही ग्राहकांच्या प्रतीक्षेत
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: राज्यातील राजकारण जसजसे तापत आहे,तसतसे येथील हवामान आणि पर्यटनातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,डिसेंबरअखेरपर्यंत बार्देश तालुक्यातील किनारी भागात उसळलेला पर्यटकांचा (Goa Tourism) ओघ सध्या मोठ्या प्रमाणात ओसरताना दिसून येत आहे. कळंगुट,बागा आणि हणजूणपासून वागातोर पर्यंतचे प्रसिद्ध किनारे किरकोळ देशी पर्यटक वगळता सध्या ओस पडू लागले आहेत. किनाऱ्यावरील शॅक्स,तसेच बार रेस्टॉरंटही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. (Flow of tourism decreases in goa state)

Goa Tourism
New voters Opinion : राजकारणात सक्षम, निष्ठावंतांची गरज!

एरवी रविवारी पर्यटकांची Goa Tourist वर्दळ असते. पण सकाळी बार्देश तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावल्याने अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु सुट्टीचा दिवस किंवा विकेंड असूनही लोकांनी घरीच राहणे पसंत केले.

कोविड Covid-19 प्रतिबंधात्मक नियमांमुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच राजकीय सभांवर निर्बंध असल्याने बार्देशातील अनेक सभागृहे मर्यादित प्रमाणात सुरू असून पूर्वीसारखा उत्साह कुठेच दिसून येत नाही. कळंगुटमधील calangute बहुतेक धार्मिक स्थळे तसेच प्रसिद्ध चर्च कोविड नियमावलीमुळे मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत खुली आहेत. शिवोलीतील प्रसिद्ध सेंट ॲंथनी चर्चच्या प्रार्थना सभा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती चर्च कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान,कोविड प्रतिबंधक उपायांच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 31 जानेवारीपर्यंत राजकीय प्रचारसभांना बंदी असल्याने राष्ट्रीय तसेच स्थानिक पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून येते. तथापि याबाबतीत कांही उतावळ्या समर्थकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे आढळून येत आहे.

शाळा- विद्यालये पुढील काही दिवसांसाठी बंद राहाणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले असून वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शिवोली, कांदोळी तसेच हळदोण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नियमित मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com