Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: डोकं पाण्यात बुडवून दीक्षा गंगवार हिची हत्या

Goa Crime News: वैद्यकीय तपासात उघड : हुंड्यासाठी छळवणूक केल्‍याचा पतीवर संशय

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: तीन दिवसांपूर्वी काब - द - राम समुद्र किनाऱ्यावर खून करण्‍यात आलेल्‍या दीक्षा गंगवार हिचा मृत्‍यू नाक व तोंड जबरदस्‍तीने पाण्‍यात बुडवून केल्‍याचे वैद्यकीय तपासात उघड झाले आहे. तिचं डोकं पाण्‍यात बुडवून ठेवून श्वासोच्छ्वास बंद केल्‍याने तिचा गुदमरून मृत्‍यू झाल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

दरम्‍यान, दीक्षाचा पती गौरव कटियार हा हुंड्यासाठी तिचा छळ करायचा. हा नवीन मुद्दाही पुढे आल्‍याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्‍याची शक्‍यता आहे.

दीक्षाचे वडील संदेश गंगवार आणि भाऊ हिमांशू गंगवार यांच्‍या उपस्‍थितीत आज मडगावच्‍या दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात ही वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली. त्‍यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्‍वाधीन करण्‍यात आला. यापूर्वी संशयित गौरव याची शारीरिक तपासणी केली असता त्‍याच्‍या छातीवर नखांचे ओरखडे सापडले होते. त्‍यामुळे आपला जीव वाचविण्‍यासाठी दीक्षाने धडपड केली असावी हाही मुद्दा पुढे आला आहे.

दीक्षा 16 रोजी गोव्‍यात आल्‍यानंतर दुसऱ्याच दिवशी 17 जानेवारी रोजी गौरवने तिचा मोबाईल फोन फोडून टाकला. त्‍यामुळे तिचा माहेरच्‍या लोकांशी संपर्क बंद झाला होता. कदाचित त्‍यावेळीच गौरवने हा खुनाचा कट रचला असावा अशी शंका दीक्षाचा भाऊ हिमांशू याने व्‍यक्‍त केली.

12 लाखांसाठी तगादा

गौरव कटियार हा कोलवा येथील हॉटेल मेरियॉटमध्‍ये व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करत होता. नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये त्‍याचा दीक्षाशी विवाह झाला होता. या विवाहाच्‍यावेळी त्‍याला दहा लाखांचा हुंडा देण्‍यात आला होता.

मात्र, आता त्‍याला नवीन गाडी खरेदी करायची असल्‍याने दीक्षाने माहेरहून आणखी १२ लाख रुपये आणून आपल्‍याला द्यावेत यासाठी त्‍याने तगादा लावला होता. याचवरून त्‍यांची रोज भांडणे व्‍हायची. त्‍यामुळे दीक्षा आपल्‍या माहेरी गेली होती. मात्र, त्‍यांच्‍यात समझोता झाल्‍याने १६ जानेवारी रोजी ती परत गोव्‍यात आली होती, अशी माहिती तिच्‍या वडिलांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT