Digambar Kamat Twitter/ ANI
गोवा

Digambar Kamat: पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारणार

काँग्रेसमधून भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचा केला पुनरुच्चार

दैनिक गोमन्तक

माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी पक्ष आपल्याला कोणतीही जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास मी तयार आहे. त्यामूळे पक्षश्रेष्टी यावर विचार करतील अन् मला खात्री आहे की, ते माझ्यासाठी योग्य अशीच जबाबदारी देतील.यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये बिनशर्त प्रवेशाचा त्यांनी पुनरुच्चार ही केला.

भाजप नेते कामत नुकतेच दिल्लीहून गोव्यात दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून नुकाताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानिमित्ताने दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांना खासदार बनवणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. याचा अर्थ कामत यांना केंद्रात संधी देण्याऐवजी राज्यातच खांदेपालट करणार का ? अशी शंका बळावते.

कामत यांना मोठी जबाबदारी मिळाल्यास भाजपमध्ये धुसफूस वाढणार ?

दिगंबर कामत यांना राज्यात मोठी जबाबदारी मिळाल्यास गोव्यातील अनेक भाजप नेत्यांचे नाराजी नाट्य सुरु होण्याची शक्यता आहे. कारण कामत यांच्या नाराजीतूनच मडगाव नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच झाली. भाजपची सत्ता असताना भाजपचा उमेदवारास पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामूळे भाजप कार्यकर्ते यावर नेमकी काय भुमिका घेणार ? हे पहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT