Morjim News
Morjim NewsDainik gomantak

Vishwajit Rane: मोरजी किनारी बेकायदेशीर वृक्षतोड; कासवही झाले 'बेघर'

गोवा सरकारने कासव संवर्धनाला ही बाधा पोहोचवल्याने केली कारवाई
Published on

पणजी: मोरजी येथे ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनालगच असलेली सुमारे 30 झाडे बेकायदेशीरपणे तोडली असून, वाळूचे ढिगारे नष्ट केल्याबद्दल वन विभागाने एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(Goa govt files FIR for disturbance near turtle nesting site)

या प्रकरणात माधलावाडा, मोरजी येथील सर्व्हे क्रमांक 123/1 येथे वाळूचे ढिग नष्ट करत संशयिताने अवैध वृक्षतोड केल्याने वनविभागाने कठोर कारवाई केली आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी उपवनसंरक्षक यांना याबद्दल अधिसूचित केले आहे. गेले अनेक महिने राज्य सरकार कासव संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत असून यात बाधा आल्याने प्रशासनाने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Morjim News
MLA Krishna Salkar: बायणा, खारीवाडा समुद्र किनाऱ्याचे रूपडे पालटणार

आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश - मंत्री विश्वजित राणे

नगर आणि देश नियोजन (टीसीपी) मंत्री असलेले विश्वजित राणे म्हणाले की, टीसीपी विभागाला याबाबत स्टॉप वर्क ऑर्डर जारी करण्याचा आणि परवाना रद्द करण्यासाठी सल्ला देण्यात आला आहे."हे उल्लंघन म्हणजे कायद्याचे उल्लंघन आहे. आणि अधिकार्‍यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय आहे. यानंतर ही कायद्याचे उल्लंघन झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारी ही मंत्री राणे यांनी दिला.

Morjim News
Goa म्हाऊस गावाला दसरोत्सवामुळे एक वेगळी ओळख!

या वर्षाच्या सुरुवातीला राणे यांनी घोषणा केली होती की, गोव्यातील अधिक क्षेत्र कासव संवर्धनासाठी अधिसूचित केली जातील आणि गोव्यात सागरी कासव संवर्धनासाठी राज्य शासन अधिक प्रयत्न करणार आहे. गेल्या हंगामामध्ये या संवर्धनात सुमारे 6,500 कासव पिल्ली यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आली आहेत.

कासवांचे संवर्धन गोव्यातील चार ठिकाणी

कासवांचे संवर्धन गोव्यातील चार ठिकाणी करण्यात आले आहे. कासवांचे संवर्धन समुद्रकिनाऱ्यांवर केले जात आहे. यामध्ये उत्तर गोव्यातील मोरजी आणि मांद्रे आणि दक्षिण गोव्यातील अगोंदा आणि अलीबाग. ऑलिव्ह रिडले कासव नोव्हेंबर ते एप्रिल या काळात अंडी घालतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com