Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मला मुख्‍यमंत्री का केले? सोनिया गांधींना विचारा! दिगंबर कामतांचे चोडणकरांना प्रत्त्युत्तर

Digambar Kamat: कामत यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, गिरीश चोडणकर यांनी नवी दिल्‍लीत सोनिया गांधी यांची भेट घ्‍यावी आणि त्‍यांना याबद्दल जाब विचारावा, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

Sameer Panditrao

मडगाव: २००७ मध्‍ये रवी नाईक यासारख्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांना डावलून दिगंबर कामत यांना मुख्‍यमंत्री करणे ही चूक होती, अशी टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केली हाेती. यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना दिगंबर कामत यांनी मला मुख्‍यमंत्री का केले, याचा जाब चोडणकर यांनी सोनिया गांधींना विचारावा, असे म्‍हणत त्‍यांना प्रत्युत्तर दिले.

काल चोडणकर यांनी कामत मुख्‍यमंत्री झाल्‍यावर राज्‍याची प्रगती खुंटल्‍याचा आरोप केला होता. त्‍यावर कामत यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, गिरीश चोडणकर यांनी नवी दिल्‍लीत सोनिया गांधी यांची भेट घ्‍यावी आणि त्‍यांना याबद्दल जाब विचारावा, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

दरम्‍यान, काँग्रेसमध्‍ये कुणीही प्रवेश केला तर आपल्‍यावर काहीच परिणाम होणार नाही, असेही मत कामत यांनी व्‍यक्‍त केले. राजकारणात शिरण्‍याचा आणि निवडणूक लढविण्‍याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिलेला आहे.

मडगावमधून जर कुणाला निवडणूक लढवायची असेल तर त्‍यांनी ती अवश्‍‍य लढवावी त्‍याचा आपल्‍यावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे ते म्‍हणाले. मागच्‍यावेळी राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री असलेले बाबू आजगावकर यांनी आपल्‍या विरोधात निवडणूक लढविली होती, याची आठवण करून देताना माझे मतदार माझ्‍यामागे ठामपणे उभे आहेत आणि मडगावची जनता हुशार आहे.

निवडणूक ताेंडावर आल्‍यावर मैदानात उतरणे ही समाजसेवा हाेत नाही. मडगावातून जर जिंकायचे असेल तर आधी मडगावकरांचा विश्‍वास आणि प्रेम जिंकावे लागेल, अशी प्रतिक्रिया कामत यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT