Goa Politics: गोव्याची प्रगती पाच वर्षे मागे गेली, चोडणकर म्हणतात, 'दिगंबर कामतांना मुख्यमंत्री केले ही आमची चूक'

Goa Congress: आमदार अपात्रतेबाबत खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, याबाबत लवकर फैसला झाल्यास २०२७ पूर्वीच मडगावमध्ये पोटनिवडणूक लागू शकते; चोडणकर
Goa Politics | Margao Congress
Girish Chodankar | Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: 'दिगंबर कामत यांना २००७ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री करणे ही आमची चूक होती. यामुळे राज्याची प्रगती पाच वर्षे मागे गेली', असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी केले आहे. तसेच, आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यास २०२७ पूर्वी मडगावमध्ये पोटनिवडणूक देखील होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

उद्योजक, विचारवंत आणि साहित्यिक दत्ता नायक यांचे चिंरजीव उद्योजक चिराग नायक यांनी गुरुवारी (२२ मे) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी चोडणकर बोलत होते. २००७ साली कामत यांना मुख्यमंत्री करणे आमची चूक होती, असे चोडणकर म्हणाले. यामुळे राज्याची प्रगती पाच वर्षे मागे गेली शिवाय आमदारांची संख्या देखील घटली असा आरोप त्यांनी केला.

Goa Politics | Margao Congress
Tragic Death: मायेच्या ओढीने 'तो' घरी आला, आईची विचारपूस करतानाच शॉक लागला; वेरेत युवकाचा मृत्यू

२०२२ विरोधी पक्षनेत्याचे पद मिळाले नाही तर पक्ष सोडण्याचे संकेतही कामत यांनी दिले होते, असा खुलासा चोडणकरांनी यावेळी केला. आमदार अपात्रतेबाबत खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, याबाबत लवकर फैसला झाल्यास २०२७ पूर्वीच मडगावमध्ये पोटनिवडणूक लागू शकते, असा शक्यता देखील चोडणकरांनी व्यक्त केली.

Goa Politics | Margao Congress
Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण

दरम्यान, चिराग यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत कामत यांच्या समोर नायक यांचे आव्हान असण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसची विचाराचे दत्ता नायक यांचे चिंरजीव चिराग यांच्या नावाला उमेदवारीसाठी पसंती मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com