Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Madgaon News : सासष्‍टीतील मतांची तफावत इतर ठिकाणी भरून काढणार : फळदेसाई

Madgaon News : गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना फळदेसाई म्‍हणाले की, भाजपच्‍या दक्षिण गोव्‍यातील उमेदवार पल्‍लवी धेंपे या किमान ५० हजार मतांच्‍या आघाडीने जिंकून येतील, कारण मुरगाव तालुक्‍याबरोबर अन्‍य चार तालुक्‍यांतही भाजपला आघाडी मिळेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon News :

मडगाव, सासष्‍टी तालुक्‍यात भाजपची कामगिरी तशी असमाधानकारकच राहिली आहे. परंतु यावेळी आमच्‍याकडे दिगंबर कामत आणि आलेक्‍स सिक्‍वेरा या दोन प्रभावी नेत्‍यांसह एकूण तीन आमदार आहेत.

कुडतरी मतदारसंघात आम्‍हाला चांगला पाठिंबा मिळतोय. त्‍यामुळे यावेळी सासष्‍टीतही चांगली कामगिरी करू आणि या तालुक्‍यात जर काही मतांची तफावत राहिलीच तर ती आम्‍ही अन्‍य मतदारसंघांत मिळणाऱ्या आघाडीने भरुन काढू, असा विश्‍‍वास समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्‍यक्त केला.

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना फळदेसाई म्‍हणाले की, भाजपच्‍या दक्षिण गोव्‍यातील उमेदवार पल्‍लवी धेंपे या किमान ५० हजार मतांच्‍या आघाडीने जिंकून येतील, कारण मुरगाव तालुक्‍याबरोबर अन्‍य चार तालुक्‍यांतही भाजपला आघाडी मिळेल.

सासष्‍टी ही भाजपसाठी ‘दुखरी नस’ असली तरी यावेळी हा तालुकाही आम्‍हाला चांगली मते देईल. दिगंबर कामत यांच्‍या मडगाव मतदारसंघात भाजपला बऱ्यापैकी आघाडी मिळणार हे निश्‍चित आहे.

याशिवाय नावेली आणि फातोर्डा येथेही आम्‍ही चांगली कामगिरी करू. कुडतरी आणि नुवेत आम्‍हाला दोन्‍ही आलेक्‍स खूपच फायद्याचे ठरतील, असेही मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

बेरोजगारीला विरियातोंसारखे एनजीओच कारणीभूत

पल्‍लवी धेंपे यांनी आपल्‍यासमोर लोकांनी बेरोजगारीचा प्रश्‍‍न मांडला असे वक्‍तव्‍य केले होते. त्‍यामुळे विरोधक गोव्‍यात बेरोजगारी असल्‍याचे भाजप उमेदवारानेच मान्‍य केले असे म्‍हणू लागले आहेत. त्‍यावर फळदेसाई यांना विचारले असता ते म्‍हणाले, बेरोजगारीचा प्रश्‍‍न आहेच. कारण गोव्‍यात खनिज उद्योग बंद आहे.

कुठलाही नवीन उद्योग आल्‍यास कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्‍यासारखे एनजीओ त्‍यास विरोध करतात. गोव्‍यातील बेरोजगारीला हे एनजीओच जास्‍त कारणीभूत आहेत. त्‍यांच्‍यामुळेच स्‍थिती बिघडते, असा सनसनाटी आरोप फळदेसाई यांनी केला.

पल्‍लवी धेंपे यांना उमेदवारी दिल्‍यामुळे भाजप कार्यकर्ते नाऊमेद झाले आहेत या म्‍हणण्‍यात काही तथ्‍य नाही. दक्षिण गोव्‍यातील प्रश्‍नांबद्दल त्‍यांना काहीही माहिती नाही, असा जो विरोधक आरोप करतात, त्‍यातही तथ्‍य नाही.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्‍याणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान VIDEO

Viral Video: दिवाळी सेलमध्ये 'रणकंदन', साडीसाठी दोन महिला एकमेकींवर तुटून पडल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Goa Rain: 'गोंयची दिवाळी, पावसांन व्हावली', हवामान खात्याकडून Yellow Alert; नागरिक आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Ind vs Aus 2nd ODI: टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात 'मैदान-ए-जंग', ॲडलेडमध्ये लकी रेकॉर्ड; 17 वर्षांपासून या मैदानावर भारताचा पराभव नाही!

SCROLL FOR NEXT