Goa: पाच वर्षात 71 व्यक्ती, 30 प्राण्यांचा मृत्यू; ढवळीकरांनी राजीनामा द्यावा - रमाकांत खलप

Goa News: गोवा सरकारने गेल्या 5 वर्षात गोव्यात वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
Ramakant Khalap And Sudin Dhavalikar
Ramakant Khalap And Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

Ramakant Khalap And Sudin Dhavalikar

2019 ते 2024 या काळात जवळपास 71 व्यक्तींचा आणि 30 प्राणी विजेच्या धक्क्याने मरण पावले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केली आहे.

गोवा विद्युत विभागाचे कर्मचारी मनोज जांबावलीकर यांचा कर्तव्य बजावताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धक्का बसल्याचे खलप यांनी म्हटले आहे.

गोवा सरकारने गेल्या 5 वर्षात गोव्यात वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती वीजमंत्री रामकृष्ण उर्फ ​​सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत दिली होती.

एवढा मोठा खर्च करूनही लोकांचे मृत्यू सुरूच असून लोकांना वीज पुरवठा संकटाचाही सामना करावा लागत आहे, असे ॲड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.

मिशन टोटल कमिशनवर डोळा ठेवून अवाढव्य खर्च करण्यालाच भाजप सरकारचे प्राधान्य आहे हे स्पष्ट दिसत आहे. करोडो रुपये खर्च केले तरी प्रत्यक्षात काहीही होत नाही, असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.

Ramakant Khalap And Sudin Dhavalikar
Manoj Parab: आरजीचे अध्यक्ष, उत्तर गोवा उमेदवार मनोज परब यांच्याविरोधात कोणते पाच गुन्हे दाखल आहेत?

गोव्यात वीज पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. उद्योगपती, व्यापारी आस्थापने आणि सरकारी विभाग यांच्याकडून अनेक कोटी रुपयांची मोठी थकबाकी वसूल करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

तथापि, दोन महिन्यांसाठी गरीब लोकांचे 500 रुपये चुकल्यास सरकार त्यांचे घरगुती वीज कनेक्शन तोडण्यास तत्परता दाखवते असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com