Church Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील फादर अँथनी फर्नांडिस यांनी खरंच पुन्हा हिंदू धर्म स्विकारला?

वाचा काय आहे व्हायरल फोटोमागचे सत्य...

Akshay Nirmale

Goa Father Anthony Fernandes: सोशल मीडियाचा अतिरेक होत असल्याच्या काळात बातम्यांची सत्यासत्यता तपासत बसण्याचा वेळ प्रत्येकाकडे असतोच असा नाही. त्यातून सोशल मीडियात आपल्यापर्यंत जे काही येते, तेच खरे मानण्याची आणि पुढे फॉरवर्ड करण्याची सवय अनेकांना लागली आहे. अशाच सवयीतून एक फोटो गेल्या काही काळात सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

भारतातील एका ट्विटर आणि फेसबूक युजरने गोव्यातील एका चर्चच्या फादरने ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पुन्हा हिंदू धर्म स्विकारल्याचे म्हटले होते. त्यात म्हटले होते की, गोव्यातील एक पादरी अँथनी फर्नांडीस जे जियोनिस्ट चर्चचे फादर आहेत, तसेच त्यांचे कुटूंबीय गेल्या 400 वर्षांपासून ख्रिश्चन धर्माचे पालन करत आहेत.

त्यांनी आता ख्रिश्चन धर्म सोडून पुन्हा मूळ सनातन धर्मात प्रवेश केला आहे. हिंदु धर्मात घरवापसीवेळी त्यांनी सांगितलेले कारणही महत्वाचे आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले होते. सोबत एक फोटोही शेअर केला होता.

(Goa Church Father Really accepted Hindu relegion?)

viral photo

तथापि, फॅक्ट फायडिंग करणाऱ्या काही लोकांमुळे यातील सत्य समोर आले आहे. या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी Yandex वर हे चित्र शोधले गेले. यादरम्यान आम्हाला हे चित्र विकिमीडिया (commons.wikimedia.org) या संकेतस्थळावर सापडले.

2008 साली या वेबसाईटवर चित्र प्रकाशित करताना, हे चित्र फादर मॅथ्यू नावाच्या टीव्ही मालिकेतील असल्याचे सांगण्यात आले. वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की चित्रात दिसणारी व्यक्ती पोलिश अभिनेता आर्टुर झमिजेव्स्की असल्याचे समोर आले आहे.

चित्राविषयी अधिक माहितीसाठी, 'Artur Zmijewski Father Mateusz' या कीवर्डसह Google केल्यावर देखील हे चित्र ATM Grupa च्या वेबसाइटवर देखील सापडले.

या वेबसाइटवर असेही म्हटले आहे की चित्रात दिसणारी व्यक्ती पोलिश अभिनेता आर्टुर झमिजेव्स्की आहे , ज्याने 'फादर मॅथ्यू' नावाच्या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

याशिवाय, गोव्यात अलीकडच्या काळात काहीच अशी कोणतीही घटना नोंदवली गेलेली नाही. त्यामुळे गोव्यातील पुरोहिताने हिंदू धर्म स्वीकारल्याचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेला हा फोटो पोलंडमधील एका टीव्ही कलाकाराचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT